काबूल : सर्व अपहृत भारतीय सुरक्षित | पुढारी

काबूल : सर्व अपहृत भारतीय सुरक्षित

काबूल ; पुढारी ऑनलाईन: अफगाणिस्‍तानची राजधानी काबूल मधील विमानतळाजवळ अपहरण झालेले सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. सर्वांच्‍या पासपोर्टची चौकशी केल्‍यानंतर तालिबान्‍यांनी त्‍यांची सुटका केली आहे. सर्व जण काबूल विमानतळाकडे  रवाना झाले आहेत, असे वृत्त अफगाणिस्‍तानच्‍या माध्‍यमांनी दिले आहे.

तालिबान्‍यांनी १५० भारतीय नागरिकांचे अपहरण केले होते. विमानतळाजवळ असणार्‍या गॅरेजमध्‍ये त्‍यांना नेण्‍यात आले.

अपहरण झालेल्‍यांमध्‍ये भारतीय नागरिकासह कही अफगाणिस्‍तानच्‍या नागरिकांसह अफगाणिस्‍तानमध्‍ये राहणार्‍या शीख बांधवांचाही समावेश होता.

दहशतवाद्‍यांनी भारतीय नागरिकांना मारहाण केल्‍याचीही चर्चा होती. मात्र अशा घटनेबाबत सरकारने कोणाताही खुलासा केलेला नाही. भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्‍याच्‍या वृत्ताचे तालिबानने नाकारले होते.

अपहरण झालेल्‍या नागरिकांना मारहाण झाल्‍याची चर्चा

अपहरण करुन भारतीय नागरिकांना मारहाण झाल्‍याची चर्चा होती. अपहरण झाल्‍यानंतर काही भारतीय मिनी व्‍हॅनच्‍याखिडक्‍याच्‍या काचा तोडून सुटका करण्‍याचा प्रयत्‍न केला.

भारतीय नागरिकांच्‍या सुरक्षेसाठी काबुल विमानतळावर भारतीय अधिकारी तैनात करण्‍यात आले आहेत.

अफगाणिस्‍तानमध्‍ये अडकलेल्‍या भारतीय नागरिकांची हे अधिकारी मदत करत आहेत. दरम्‍यान, भारतीय हवाई दलाचे विमान काही वेळातच ८५ भारतीयांना घेवून मायदेशी येणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

काबूलमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात आणण्‍यासाठी अधिकारी प्रयत्‍न करत आहेत. यासाठी भारतीय हवाई दलाचे सी १७ हे विमान रवाना झाले होते. या विमानातून परराष्‍ट्र मंत्रालयातील कर्मचार्‍यांना सुखरुप देशात आणण्‍यात आणले होते.

मंगळवारी सुमारे १३० नागरिकांना घेवून दुसरे विमान दाखल झाले होते. यामध्‍ये अफगाणिस्‍तानमधील भघरतीय राजदूत आर. टंडन, दुतावासातील कर्मचार्‍यांसह जामनगरमधील लॅडिंग झाल्‍यानंतर सर्व कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला होता. देशात परतल्‍यानंतर नागरिकांना भारत माता की जय आणि वंदे मातरमच्‍या घोषणा दिल्‍या होत्‍या.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button