निहारिका तिवारीलाही धमकी; ‘अब तेरी बारी!’ | पुढारी

निहारिका तिवारीलाही धमकी; ‘अब तेरी बारी!’

जगदलपूर : प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी टीव्ही शो रोडीज्ची माजी स्पर्धक तसेच अभिनेत्री निहारिका तिवारी हिलाही उदयपूरच्या कन्हैयालालप्रमाणे गळा चिरण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. इन्स्टाग्राम यूझर्सनी ‘तुझे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. अब तेरी बारी है’ अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या आहेत.

निहारिका हिने उदयपुरातील घटनेचा सोशल मीडियावरून निषेध केला होता. तेव्हापासून तिला या धमक्या दिल्या जात आहेत. भिलाई येथील युवकालाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. निहारिका ही छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या ती एका चित्रीकरणानिमित्त इंडोनेशियात आहे.

हेही वाचा:

 

Back to top button