प्रियकराच्‍या मदतीने पतीचा काढला काटा, दोन वर्षांनी प्रियकराने… | पुढारी

प्रियकराच्‍या मदतीने पतीचा काढला काटा, दोन वर्षांनी प्रियकराने...

 पुढरी ऑनलाईन डेस्‍क : 

प्रियकराच्‍या मदतीने तिने पतीचा खून केला. यानंतर आपल्‍या दोन मुलांसह ती प्रियकराबरोबर राहू लागली. मात्र अनैतिक संबंधातून तयार झालेल्‍या नात्‍याचा शेवटही तितकाच भयंकर झाला. प्रियकरासाठी पतीला संपविणार्‍या महिलेचा दोन वर्षांनी दुर्दैवी अंत झाला. एखाद्‍या चित्रपटालाही लाजवेल असे हे कथानक उत्तर प्रदेशमधील इटावा शहरात घडले आहे. महिलेच्‍या खून प्रकरणी पाेलिसांनी तरुणाला अटक केल्‍यानंतर धक्‍कादायक सत्‍य समाोर आले आहे.

याप्रकरणी स्‍थानिक पाेलिसांनी सांगितले की,  इटावामध्ये एका  नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. पाेलिसांनी गुन्‍हा दाखल केला. तपासात ही महिला राजस्थानमधील असल्‍याचे आढळले. त्या महिलेला दोन मुलं आहेत, अशी माहिती समाेर आली. तसेच संबंधित महिला इटावामध्ये आपल्‍या दोन मुले आणि प्रियकरासोबत राहत असल्याचे उघड झाले.

दाेन वर्षांपूर्वी झालेल्‍या खुनाला फुटली वाचा

महिला तिच्या दोन मुलांसोबत राहत हाेती. पोलिसांनी तिच्या प्रियकर सतीश यादव याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पाेलीस चाैकशीत त्‍याने आपण महिलेचा  गोळी झाडून खून केल्‍याची कबुली दिली. त्‍याने सांगितले की, संबंधित महिला पती  गजेंद्र व दाेन मुलांसह नोएडामध्ये राहत होती. एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये गजेंद्र आणि सतीश दोघेही चालक म्हणून काम करत होते. तेथे दोघांची मैत्री झाली. त्यानंतर सतीश याचं गजेंद्रच्‍या पत्नीबराेबर अनैतिक संबंध निर्माण झालं. सतीश, गजेंद्र व त्याची पत्नी  इटावा येथे फिरायला गेले. इटावामध्ये गजेंद्रला त्‍याच्‍या पत्‍नी आणि सतीशने दारू पाजली. यानंतर त्‍याला कारमध्‍ये बसवून कार तलावात ढकलून दिली. गजेंद्रचा मृत्यू तलावात बुडाल्याने झाल्याचे सांगण्यात आले.

गजेंद्रचा खून केल्‍यानंतर त्‍याची पत्‍नी  दोन महिने सासरी राजस्थानच्या झुंझनू येथे गेली.  दोन्ही मुलांना घेऊन कुटुंबियांना न सांगता सतीशसोबत इटावाला पोहोचली.  सतीश आणि मिथिलेश पती-पत्नीसारखे राहू लागले होते. दोन वर्षांनी सतीशला महिलेचे अआणखी एका तरुणाबराेबर संबंध असल्‍याचा संशय आला. एक दिवस ताे  पूजेच्या बहाण्याने महिला मंदिरात घेवून गेला. तिथे असलेल्या जंगलात जाताच तिच्यावर गोळी झाडली. तिचा मृत्‍यू झाल्‍याची  खात्री झाल्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकला.

Back to top button