भाजपची आजपासून हैदराबादेत राष्ट्रीय कार्यकारिणी | पुढारी

भाजपची आजपासून हैदराबादेत राष्ट्रीय कार्यकारिणी

हैदराबाद, वृत्तसंस्था : दक्षिणेकडील राज्यांवर विशेषत: तेलंगणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, राष्ट्रीय कार्यकारिणी शनिवारपासून हैदराबादेत सुरू होत आहे.

2004 मध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना दक्षिणेत भाजपची बैठक झाली होती. त्यानंतर 18 वर्षानंतर बैठक होत असल्याचे सांगण्यात आले. तेलंगणात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक महत्त्वाची मानली जाते. शनिवारी दुपारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने बैठकीला प्रारंभ होणार असून, पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने समारोप होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुका, संघटनात्मक पातळीचा विषय चर्चिला जाईल. या बैठकीला 300 हून अधिक राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांची रविवारी हैदराबादेत परेड ग्रावूंडवर सभा होणार आहे, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली.पंतप्रधानांची सभा असल्याने मैदान परिसरातील नागरिकांनी बाहेर न पडता घरातच थांबावे, वर्क फ्रार्म होम करावे, अशा सूचना देण्यात आहेत. या सभेसाठी दहा लाख लोक जमविण्याचे टार्गेट पक्षाने ठरविले आहे. बैठकीच्या अनुषंगाने हैदराबाद शहर भगवेमय झाले आहे. शहरात ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि तेलंगणा भाजपचे प्रमुख बी. संजय यांचे कट-आउट्स हैदराबादमधील मोक्याच्या जागेवर लावण्यात आले आहेत. टीआरएसने विरोधात बॅनर्स लावले आहेत.

Back to top button