Heavy Rain Fall : ११ राज्यांत मुसळधारचा पावसाचा इशारा | पुढारी

Heavy Rain Fall : ११ राज्यांत मुसळधारचा पावसाचा इशारा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील बहुतांश राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय (Heavy Rain Fall) झाला असून जिथे अद्याप पाऊस पोहचलेला नाही तिथे आगामी काही दिवसांत पोहोचू शकतो. मुंबई, राजस्थानात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. भोपाळमध्येही अडीच तासांत सव्वा तीन तास पाऊस झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्यप्रदेश, राजस्थानसह 11 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम बंगाल, सिक्‍कीम, आसाम, मेघालय, महाराष्ट्र, गोवा उत्तर कर्नाटक, उत्तर केरळ येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब-हरियाणा येथे मध्यम आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस होईल.

देशात यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा 8 टक्के कमी पाऊस (Heavy Rain Fall) झाला आहे. आकडेवारीनुसार मध्य भारतात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा 14 टक्के कमी पाऊस झाला आहे. बिहारमध्ये सरासरीपेक्षा 6 टक्के अधिक पाऊस झाला आहे. गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्व कोटा पूर्ण केला आहे.

पंजाबमध्ये 6 जुलैपर्यंत मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशातील 23 जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button