नवी दिल्ली : बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्याची फाशी कायम | पुढारी

नवी दिल्ली : बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्याची फाशी कायम

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  मानसिक दृष्ट्या विकलांग असलेल्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

मनोज सिंग नावाच्या इसमाला या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने फाशी सुनावली होती. या शिक्षेविरोधात सिंग याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशी कायम ठेवली आहे.

एका लहान मुलीवर बलात्कार करून तिची क्रूर हत्या करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. अशावेळी गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, तर समाजात सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन जाईल, अशी टिप्पणी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने निकाल देताना केली.

Back to top button