शिंदेसेनेला भाजपचा पाठिंबा, एकनाथ शिंदेंकडून मान्य! व्हिडिओ व्हायरल | पुढारी

शिंदेसेनेला भाजपचा पाठिंबा, एकनाथ शिंदेंकडून मान्य! व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या बैठकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे पण अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पाठिंब्याबाबत संकेत दिले आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या आमदारांचे प्रतिनिधित्व करत आमदार तानाजी जाधव यांनी एकनाथ शिंदे हे आपल्या गटाचे नेते असतील असे त्यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे व्हिडिओमध्ये म्हणतात की, भाजपने पाकिस्तानला धडा शिकवलाय. आपण एकजुटीने राहू. कुठेही काहीही कमी पडू दिले जाणार नाही. मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. महाशक्ती आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे….

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची बैठक सुरू असल्याचे दिसत आहे. यावेळी एकनाथ शिंदे सर्व आमदारांच्या पुढे खुर्चीत बसले आहेत. त्यांच्या समोर आमदार बसले आहेत. यावेळी आमदार तानाजी सावंत उठतात आणि आमच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा तुम्ही घ्याल. तुम्ही आमचे गटनेते आहात, असे ते स्पष्ट करतात. त्यानंतर सर्व आमदार टाळ्यांचा कडकडाट करत शिंदेंचे अभिनंदन करतात आणि हात वर करून तानाजी सावंतांच्या प्रस्तावावर अनुमोदन देतात.

त्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करताना बोलतात. ते म्हणतात की, जे काय सुख दु:ख आहेत ते आपल्या सगळ्यांचे एक आहे. त्यावर सर्व आमदार होय.. होय.. असा प्रतिसाद देतात. काही असेल ते आपण एकजुटीने, कितीही काहीही होऊ द्या, विजय आपलाच आहे, असा विश्वास सर्व आमदारांना देतात.

यापुढे ते आमदार दिपक केसरकर यांच्याकडे बोट करून म्हणतात की, ‘तुम्ही जे म्हणाला… की, नॅशनल पार्टी आहे (अप्रत्यक्षरित्या भाजप). ती महाशक्ती आहे. ज्यांनी आख्ख्या पाकिस्तान… म्हणजे… काय परिस्थिती होती माहीत नाही. तर याच्यामध्ये ‘त्यांनी’ (अप्रत्यक्षरित्या भाजप नेता) मला सांगितले… तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे. हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे… याच्या मागे आपमची सर्व शक्ती आहे… कुठेही काही लागलं तर कधीही काही पडणार नाही… याची प्रचिती आपल्याला जेव्हा-जेव्हा गरज भासेल तेव्हा येईल…’

 

Back to top button