Honda Amaze Price & Features : तब्बल २४ ॲव्हरेज, सर्वांत स्वस्त आणि बरचं काही | पुढारी

Honda Amaze Price & Features : तब्बल २४ ॲव्हरेज, सर्वांत स्वस्त आणि बरचं काही

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2021 Honda Amaze Price & Features जापनीज होंडा कंपनीने भारतीयांसाठी नवीन फिचर्सह अमेझ होंडा (Honda Amaze) कार बाजारात आणली आहे.

दरम्यान या कारचे इतर कारपेक्षा फिचर्स अधिक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. होंडा अमेझचे (Honda Amaze) नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्यात आल्याने ग्राहकांना नवीन संधी दिल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीकडून या वाहनात विशेष वेगळे बदल केले आहेत. होंडा अमेझ पुर्वीपेक्षा अधिक चांगली बनवली असल्याचे कंपनी सांगते. दरम्यान अमेझच्या फिचर्समध्ये बदल केल्याने किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. या कारची ६ लाख ३२ हजारपासून मुळ किंमत सूरू होते.

होंडा अमेझआकर्षक कलर आणि मजबूत इंजिन असलेल्या होंडा अमेझला एकूण तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. व्हीएक्स, एस आणि ई हे तीन प्रकार ग्राहकांच्या पसंतीस ठेवले आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह मॅन्युअल आणि अॅटोमॅटीक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. या व्यतिरिक्त, कारच्या डिझाइनमध्ये कॉस्मेटिक बदल देखील केले गेले आहेत. यामध्ये कंपनीने पाच कलर दिले आहेत.

अमेझच्या बाहेरच्या लूकमध्ये हे असतील बदल

या वाहनामध्ये विशेष बदल हा त्याच्या पुढच्या आकारावरून स्पष्ट दिसून येतो. तसेच या वाहनाला नवीन फ्रंट ग्रिल देण्यात आले आहे. पूर्वीच्या वाहनापेक्षा बम्परवरील फॉग लॅम्प हाऊसिंगमध्येही बदल केले गेले आहेत. त्याचबरोबर नवीन क्रोम गार्निश देण्यात आले आहे.

नवीन लाँच करण्यात आलेल्या अमेझचे व्हिएक्स मॉडेलमध्ये त्यांनी विशेष बदल केला आहे. LED डे-टाइम रनिंग लॅम्प आणि LED फ्रंट फॉग लॅम्पसह ऑटोमेटिक एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत.

याचबरोबर क्रोम डोअर हँडल त्याचबरोबर १५ इंचाचा डायमंड कट डुअल-टोन अलॉय व्हील दिल्याने या गाडीचा लूक पुर्णच चेंज होतो.

दरम्यान सी आकाराचा एलईडी टेल लाइट्स बरोबर नवीन क्रोम गार्निश आणि बम्परवर रिफ्लेक्टर सुद्धा देण्यात आले आहेत.

वाहनाच्या आतल्या बाजूस असतील हे बदल

दरम्यान गाडीच्या आतल्या बाजूस विशेष बदल करण्यात आले नाहीत जून्या वाहनाच्या तुलनेत किरकोळ बदल असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

डॅशबोर्ड आणि स्टीयरिंग व्हीलमध्ये नवीन सिल्वर अॅक्सेंटसह काही बदल केले आहेत.

याशिवाय गिअर बॉक्सवर लेदर सरफेसिंग देण्यात आले आहे, यामुळे अमेझला प्रीमियम फील आल्याचे जाणवते.

नवीन अमेझमध्ये फ्रंट मॅप लॅम्प, एसी व्हेंट नॉब्ससाठी नवीन क्रोम फिनिश, डस्ट फिल्टर आणि ट्रंकच्या लीडवर नवीन इनसाइड लायनिंग सुद्धा देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, टॉप-स्पेस व्हीएक्स मॉडेलमध्ये एक्सक्लूझीव्ह फॅब्रिक सीट ७.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम बसवण्यात आले आहेत. यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले कनेक्ट करण्यात आला आहे.

नवीन होंडा अमेझच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये १.२ लिटर इंजिन आहे जे ८८ एचपी पॉवर आणि ११० एनएम टॉर्क जनरेट करते. तर डिझेल प्रकारात कंपनीने १.५ लिटर इंजिन दिले आहे, यामध्ये CVT ट्रांसमिशन ट्रिम ८० एचपी पॉवर आणि १६० एनएम टॉर्क जनरेट देण्यात आले आहे. तर मॅन्युअल मध्ये १०० एचपी पॉवर आणि २०० एनएम टॉर्क जनरेट देण्यात आले आहे. यामध्ये पेट्रोल मॉडेल १८ किमी आणि डिझेल मॉडेल २४ kmpl पर्यंत मायलेज देते.

Back to top button