सीएसआयआर सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मुळे 

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च अर्थात सीएसआयआरच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य  सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे सुपूत्र आणि भारतीय विदेश सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची नियुक्ती झाली आहे.

अनेक देशांचे राजदूत

परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिलेल्या ज्ञानेश्वर मुळे यांनी अनेक देशांचे राजदूत म्हणूनही काम पाहिलेले आहे.

सीएसआयआरच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य सल्लागार समितीत सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यात सीएसआयआर-एनएएलचे संचालक जे. जाधव, सीआरआरआय विभागाचे संचालक डॉ. सतीश चंद्रा, एनजीआरआय विभागाचे संचालक डॉ. व्ही. एम. तिवारी, आयआयसीटी विभागाचे प्रमुख डॉ. एस. चंद्रशेखर, सीईसीआरआय विभागाचे संचालक डॉ. एन. कनाईसेल्वी, कृषी, न्यूट्रिशन आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सरोज बरीक, डीएसटीचे आयबीसी विभागाचे प्रमुख एस. के. वर्ष्णे, आयएसटॅडचे प्रमुख डॉ. रामास्वामी बन्सल यांचा समावेश आहे.

समन्वयकपदी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अनुराधा मधूकर

याशिवाय समन्वयक म्हणून आयएसटॅडच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अनुराधा मधूकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 हा व्हिडिओ पाहिला का? 

https://www.youtube.com/watch?v=_xaZB5rAC-A

 

Exit mobile version