Great Resignation : भारतातही येणार? सहा महिन्यांमध्‍ये ८६ टक्‍के कर्मचारी राजीनामे देणार ; 'मायकेल पेज'ची पाहणी | पुढारी

Great Resignation : भारतातही येणार? सहा महिन्यांमध्‍ये ८६ टक्‍के कर्मचारी राजीनामे देणार ; 'मायकेल पेज'ची पाहणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

Great Resignation याबद्दल आपण सर्वांना ऐकलेले असेलच. अमेरिकेत कर्मचारी धडाधड राजीनामे देत आहेत. आता हीच परिस्थिती भारतात येईल, असा इशारा मायकेल पेज या कंपनीने दिला आहे. मायकेल पेज नोकरभरती संदर्भातील सेवा पुरवणारी जगातील अग्रगण्य कंपनी आहे. येत्या सहा महिन्यांमध्‍ये भारतातील ८६ टक्के कर्मचारी विविध कारणांमुळे राजीनामे देतील, असे भाकित या कंपनीने वर्तवले आहे.

Great Resignation : ‘हे’ असेल राजीनामा देण्‍याचे मूळ कारण

घरातून काम करण्याची संधी मिळावी यासाठी कमी पगाराची नोकरी पत्करण्याची मानसिकता अनेक कर्मचाऱ्यांची असेल, असे मायकेल पेज या कंपनीने म्हटले आहे. हा ट्रेंड सर्व उद्योगांत पाहायला मिळेल. शिवाय विविध स्तरांवरील कर्मचारी राजीनामे देतील.  गुणवत्ता असणारे कर्मचारी नोकरी सोडून जाणे, हे फार गंभीर असते. सध्याची स्थिती पाहता कंपन्यांना हा मोठा धोका असेल, जास्त पगार, कामातून मिळणारे समाधान, कार्यसंस्कृती, मोठे पद अशा विविध कारणांनी कर्मचारी राजीनामे देतील, असेही या कंपनीने म्हटले आहे.

सध्या वर्क फ्रॉम होम, हायब्रीड की वर्क फ्रॉम ऑफीस अशापैकी कोणती कामाची पद्धत निवडायची याबद्दल कंपन्यांच्या पातळीवर स्पष्ट धोरण ठरलेले नाही, शिवाय कोरोनामुळे जी निर्बंध येत आहेत, त्यामुळेही ही कर्मचारी राजीनामे देतील, असे मायकेल पेजने म्हटले आहे.

योग्य नोकरी, योग्य मूल्ये आणि योग्य कार्यसंस्कृती असा मेळ घालून कर्मचारी नोकरी शोधत आहेत, असे पाहणीत दिसून आले आहे. त्‍यामुळे आपण कोणत्या कंपनीत काम करतो आणि त्या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू आता कर्मचाऱ्यांसाठी फार महत्त्वाची राहिलेली नाही, असे मायकेल पेजने म्हटले आहे. कोणत्या देशातील कर्मचारी नोकरी सोडून जाण्याच्या मनःस्थितीत आहेत, या सर्व्हेत भारताचा क्रमांक बराच वरचा असून, त्या खालोखाल इंडोनेशिया, फिलपाईन्स यांचा क्रमांक आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button