काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुष्मिता देव यांचा राजीनामा | पुढारी

काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुष्मिता देव यांचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेसच्या माजी खासदार आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुष्मिता देव यांनी राजीनामा देत पक्ष सोडला आहे. त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिलीआहे. सुष्मिता देव यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते.

२०१४ मध्ये मोदी लाटेतीही सुष्मिता देव यांनी आसाममधील सिल्चर येथून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना महिला काँग्रेसच्या अध्यक्ष करण्यात आले होते. आसाममधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर देव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मोठा झटका बसला आहे.

सोशल मीडियातून नाराजी

देव यांनी राजीनामा दिल्याची बातमी त्यांच्या सोशल मीडिया इन्फोमधून प्रथम कळली.

त्यांनी स्वत:च्या इन्फोमध्ये काँग्रेस पार्टीची माजी नेता असे त्यात नमूद केले. राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले.

त्यानंतर देशभरातील ज्या नेत्यांची अकाऊंट लॉक केली त्यात देव यांच्या अकाउंटचा समावेश होता.

हे अकाउंट अनलॉक केल्यानंतर देव यांनी इन्फो बदलल्याचे लक्षात आले. ही एकप्रकारे देव यांची पक्षातून एक्झिट होती.

सुष्मिता देव यांनी राजीनामा देताना त्यांनी काँग्रेसचे व्हाटॅस ॲप ग्रुपही सोडले होते. त्यानंतर त्यांनी ट्विटर अकाउंटवरून आपल्या पदाची ओळख हटविली होती.

सोनिया गांधी यांचे मानले आभार

‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील, मॅडम तुमचे आभार.’

अशा शब्दांत देव यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत.

त्या म्हणतात, ‘या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते.

माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात.’

पक्षाला विचारमंथन करावे लागेल

सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटले आहे. पक्षात पुन्हा एकदा जुणे आणि नवे असा संघर्ष सुरू झाला आहे.

एका बाजुला तरुण नेते कार्ति चिदंबरम यांनी पक्षाला आवाहन केले आहे की देव यांच्यासारखे तरुणांचे नेतृत्व करणारे नेते पक्ष सोडून जात असतील तर विचार करावा लागेल.

कपील सिब्दल यांनही ट्विट करून पक्षाने विचार करावा असे आवाहन केले आहे.

तृणमूलमध्ये जाऊ शकतात देव

काँग्रेस सोडल्यानंतर सुष्मिता देव कोणत्या पक्षात जाणार याकडे आता लक्ष लागले आहे. असे सांगितले जाते की त्या तृणमूल काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. त्या लवकरच अभिषेक बनर्जी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

 हे ही वाचा :

पहा व्हिडिओ 

Back to top button