अफगाणिस्तान : तालिबानचा कब्जा; मलाला युसूफझई काय म्हणाली?
पुढारी ऑनलाईन डेस्क; तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानमधील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांततेचं नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझई हिने ट्विट केले आहे. मलाला हिने ट्विटमधून महिला, अल्पसंख्यांक आणि मानवी हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
”तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. मी महिला, अल्पसंख्यांक आणि मानवी हक्कांबाबत खूप चिंतित आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी तातडीने युद्धबंदीची मागणी केली पाहिजे. तातडीने मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत दिली पाहिजे आणि निर्वासित आणि नागरिकांचे संरक्षण करायला हवे,” असे मलालाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
मलालाचा जन्म १२ जुलै १९९७ मध्ये पाकिस्तानात झाला. तिला वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तिने लहान वयापासूनच महिलांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली.
तसेच मुलींच्या शिक्षणासाठी अभियान सुरु केले होते. पण तालिबान्यांनी मलालाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, चांगले उपचार मिळाल्याने मलालाला जीवनदान मिळाले. आता तिने अफगाणिस्तानमधील संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; सुरक्षेत वाढ
- सांगली : उमदी येथील वृद्ध चुलतीचे अपहरण करून कर्नाटकात खून
अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर काबूल शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अफगाणिस्तानातून पलायन करण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे.
येथे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानातील युद्ध संपल्याचे जाहीर करत शासन व्यवस्थेबाबत लवकरच माहिती देणार असल्याचे म्हटले आहे.
गोळीबारानंतर काबूल विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.
यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत काबूल विमानतळावरील परिस्थिती भयावह दिसून येत आहे.
- अफगाणिस्तान : देश सोडून जाण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर गर्दी
- कोल्हापूर : डेल्टा प्लस कोरोनाचे ६ रुग्ण
तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी देश सोडून पळून गेले आहेत. ते उझबेकिस्तानला गेले असल्याचे समजते.
हे ही वाचा :
- Independence day कोल्हापूर : मटनाचं काय सांगता, ३ टन जिलेबी फस्त!
- अफगाणिस्तान तालिबान च्या पंज्यात; एका मागोमाग एक शहरांवर कब्जा
- मुख्यमंत्री मरु द्या, आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या : दत्तामामा भरणे
We watch in complete shock as Taliban takes control of Afghanistan. I am deeply worried about women, minorities and human rights advocates. Global, regional and local powers must call for an immediate ceasefire, provide urgent humanitarian aid and protect refugees and civilians.
— Malala (@Malala) August 15, 2021