व्हिडीओ व्हायरल : जखमी माकडीण उपचारासाठी स्वतःच पोहोचली दवाखान्यात | पुढारी

व्हिडीओ व्हायरल : जखमी माकडीण उपचारासाठी स्वतःच पोहोचली दवाखान्यात

रोहतास; वृत्तसंस्था : बिहारच्या रोहतास शहरातील एका खासगी दवाखान्यात एक जखमी माकडीण स्वतः च उपचारासाठी आल्याची आश्‍चर्यकारक घटना घडली आहे. तिच्या डोक्याला जखम झाली होती. डॉक्टरांनी तिच्या जखमेवर मलम लावला. त्यानंतर माकडीण बेडवर झोपली. यावेळी तिने आपल्या पिल्लाला पोटाशी कवटाळले होते, याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून माकडीणीच्या समजूदारपणाचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, रोहतास शहरातील एका परिसरात आपल्या पिल्ल्याबरोबर एक माकडीण फिरत असते. तिच्या डोक्याला मार लागल्यानंतर डॉ.एस.एम. अहमद यांच्या दवाखान्यासमोर येऊन बसली. दवाखान्यातील एक कर्मचार्‍याने जखमी माकडीणीला पाहिल्यानंतर तिला उचलून आता नेले आणि उपचार केले. उपचारावेळी ही माकडीण खुर्चीवर एकदम शांत बसली होती. काहीवेळानंतर ती गुपचूप निघून गेली.

Back to top button