पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील १६ महत्वाचे मुद्दे | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील १६ महत्वाचे मुद्दे

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान देशाला संबोधित करत होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वांना शुभेच्छा देत, मोदींना आज राष्ट्राच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सैनिकांना अभिवादन केले. कोरोना महामारीमध्ये अविरत कष्ट करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील सर्वांना अभिवाद करत पुढील महत्वाचे मुद्दे मांडले. ते मुद्दे कोणते ते पाहूया…

  1. ७५ वा स्वातंत्र्य दिन नसून संकल्पपूर्तीचा नवा ध्यास आहे.
  2. ‘सबका साथ, सबका विकास’ आता याचबरोबर आता ‘सबका विश्वास, सबका प्रयास’ हे सूब अवलंबलं पाहिजे.
  3. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान भारतात सुरू आहे.
  4. कुपोषण मुक्त भारताचा केंद्र सरकाराचा निर्धार केला आहे.
  5. देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही शिक्षण घेता येणार.
  6. गरिबांना रेशन दुकानात मोफत तांदळाचं वाटप करणार.
  7. सहकार क्षेत्राला अधिक बळ देण्याचा निर्धार.
  8. केंद्र सरकारचा ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मची निर्मिती करण्याचा निर्धार.
  9. महिला गटांनी बनवलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देणार.
  10. कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना केंद्र सरकार आणणार.
  11. ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ ‘वंदे भारत’ रेल्वे भारताची घोषणा करण्यात आली.
  12. रेल्वे आणि जलमार्गाचे जाळं वाढविण्याचा सरकारचा निर्धार केला आहे
  13. भारत ३ बिलियन डाॅलर किमतीचे मोबाईल फोनची निर्यात करतो, महत्वाची माहिती.
  14. कालबाह्य झालेले नियम आणि प्रक्रिया रद्द करण्याचे केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन
  15. कालबाह्य कायद्याच्या कचट्यातून देशाची सूटका करण्याची वेळ आहे.
  16. मातृभाषेतून सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा केंद्र सरकारचं धोरण. गरिबांना साक्षर करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण आवश्यक, असे सर्व महत्वाचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले.

पहा व्हिडीओ : नागपंचमी स्पेशल : आरेच्या जंगलात साप एक थ्रिलिंग अनुभव !

हे ही वाचलंत का? 

Back to top button