स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान म्हणाले, "हीच वेळ आहे देशाला बदलण्याची" | पुढारी

स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान म्हणाले, "हीच वेळ आहे देशाला बदलण्याची"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : “७५ वा स्वातंत्र्य दिन हा एक समारंभ नसून नव्या संकल्पपूर्तीचा ध्यास आहे. पण, परिश्रम आणि पराक्रमाची पराकाष्टा करूनच आपल्या नवा ध्यास पूर्ण करायचा आहे. कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहिला नाही पाहिजे. हीच वेळ आहे आपल्या देशाला बदलण्याची आणि स्वतःला बदण्याची संधी आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’, आता याबरोबर ‘सबका प्रयास’, हे सूत्रही आपण अनुसरलं पाहिजे”, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

स्वातंत्र्य दिन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान देशाला संबोधित करत होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वांना शुभेच्छा. आज राष्ट्राच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सैनिकांना अभिवादन करत आहे. कोरोना महामारीमध्ये आरोग्य क्षेत्रातील सर्वांना अभिवाद करत आहे. १४ ऑगस्ट ‘फाळणी वेदना दिवस’ पाळला जाणार आहे.

“कोरोना काळात भारताने खूप संयम दाखवला आहे. ६४ कोरोड लोकांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. ८० कोरोड लोकांना सलगपणे अन्नदान करण्यात आलं. जगातील सर्वांत मोठी लसीकरणाची मोहीम भारताने सुरू केली आहे. तुलनेने आपल्या देशात प्रतिकुलता जास्त आहे. त्यामुळे आपणं कोरोनाकाळात खूप जणांना वाचवू शकलो नाही. हे दुःख कायम आपल्यासोबत राहणार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला देश म्हणून पुन्हा उभा राहण्याची वेळ आली आहे”, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

“भारताने स्वातंत्र्यासाठी मोठी संघर्ष केला आहे. आपल्या देशातील खेळाडुंचा, या युवा पिढीचा सन्मान करूया. या खेळाडुंनी आपल्याला प्रेरित करायचं काम केलं आहे. फाळणीचा दुःख आज भारताला सलत राहत आहे. स्वातंत्र्यानंतर क्रांतीकारकांना आपण विसरलं गेल आहोत. स्वातंत्रलढ्यात ज्यांना अत्याचार सहन केला, त्यांचे ऋण मानले पाहिजेत. शहीद झालेल्यांना श्रद्धांजली समर्पित आहे”, असेही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

पहा व्हिडीओ : दै. पुढारीने पूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेत्यांना दिले जगण्याचे बळ

Back to top button