without internet : इंटरनेटशिवाय माेबाईलवर पाहा व्हिडीओ, क्रिकेट, चित्रपट तेही अल्‍प खर्चात! | पुढारी

without internet : इंटरनेटशिवाय माेबाईलवर पाहा व्हिडीओ, क्रिकेट, चित्रपट तेही अल्‍प खर्चात!

येत्या काही दिवसांत तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय ( without internet ) व्हिडीओ, क्रिकेट, चित्रपट आणि इतर मल्टीमीडिया सामग्री थेट तुमच्या मोबाईलवर पाहू शकाल, असे कोणी सांगितले तर त्यावर सहज विश्वास बसणार नाही. मात्र आता डायरेक्ट-टू-मोबाईल (डी-टू-बी) तंत्रज्ञानाद्वारे हे शक्य होऊ घातले आहे.

देशात 1.2 अब्ज मोबाईल फोन

देशात 1.2 अब्ज मोबाईल फोन असून त्यातील सुमारे 750 दशलक्ष स्मार्टफोन. 80 टक्क्यांपेक्षा जास्त वापरकर्ते त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट वापरतात.

without internet : आयव्हीटीचा थक्क करणारा वेग

2017-2022 दरम्यान थेट इंटरनेट व्हिडिओ ट्रॅफिक (आयव्हीटी) 15 पट वाढले. आता जेव्हा नवे तंत्रज्ञान वास्तवात उतरेल तेव्हा आयव्हीटीमध्ये होत जाणारी वाढ डोळे दिपवणारी असेल.

without internet : काय आहे डी-टू-बी तंत्रज्ञान

डी-टू-बी तंत्रज्ञानाद्वारे थेट फोनवर प्रसारित केली जाऊ शकते. हे तंत्रज्ञान ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्ट एकत्र करून तयार केले जाईल.
फेक न्यूज रोखणे, आपत्कालीन अलर्ट जारी करणे आणि आपत्ती व्यवस्थापनात याचा मोठा फायदा.

ग्राहकांना कोणताही मोबाईल डाटा खर्च न करता थेट त्यांच्या मोबाईलवर व्हिडीओ ऑन डिमांड म्हणजे मागाल तेवढीच सामग्री मिळू शकेल.

अल्प खर्च आणि ग्रामीण भागातील मोबाईल ग्राहकांनादेखील लाभ.
दूरसंचार सेवा देणार्‍या कंपन्यांना सर्वात मोठा फायदा.
कॉल ड्रॉप कमी होण्यास आणि डाटाचा वेग वाढण्यास मदत.
नव्या तंत्रज्ञानामुळे ब्रॉडकास्टर्सना नवीन प्रेक्षक मिळणार.
येत्या काही वर्षांत ग्राहकांची संख्या वाढेल 100 दशलक्षांपर्यंत.

Back to top button