‘राहुल गांधींनी फोटो शेअर केल्‍याबद्‍दल आक्षेप नाही’ | पुढारी

'राहुल गांधींनी फोटो शेअर केल्‍याबद्‍दल आक्षेप नाही'

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : बलात्‍कार करुन खून केलेल्‍या अल्‍पवयीन मुलीच्‍या आई-वडिलांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट दिली होती. यानंतर त्‍यांनीआपल्‍या ट्‍विटर अकाउंटवरुन या भेटीचा फोटो शेअर केला होता. यावरुन ते वादाच्‍या भोवर्‍या सापडले आहेत. राहुल गांधींसह पक्षातील ज्‍येष्‍ठ नेत्‍यांसह ५ हजार ट्‍विटर अकाउंट लॉक करण्‍यात आली आहेत. आता या फोटो शेअर बाबत पीडितेच्‍या आईने आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

पीडिताचे आईने राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. आम्‍हाला फोटोशेअर केल्‍याबद्‍दल किंवा याप्रकरणी ट्‍विट केल्‍याबद्‍दल आक्षेप नाही, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचा आक्षेप

राहुल गांधींनी आपल्‍या ट्‍विटर अकाउंटवरुन शेअर केलेल्‍या फाेटाेस राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने यावर तीव्र आक्षेप घेतला. ट्‍विटरला संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तसेच फेसबुकलाही राहुल गांधींच्‍या इंस्‍टाग्राम प्रोफाईलवर कारवाईची मागणी केलीआहे.

अल्‍पवयीन पीडिताच्‍या पालकांचा फोटो सोशल मीडियावरुन प्रसिद्‍ध करत पीडितेची ओळख जाहीर झाली आहे. ही कृती कायदाचा भंग करणारी आहे, असे राष्‍ट्रीय बाल अधिकार संसक्षण आयोगाने फेसबूकला दिलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.पीडितेची ओळख जाहीर करणार्‍यांवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी ही आयोगाने केली होती. यानंतर राहुल गांधी यांच्‍यापाठोपाठ काँग्रेसचेही ट्‍विटर अकाउंट लॉक करण्‍यात आले होते.

‘ट्‍विटरचे धोरण पक्षपाती’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्‍यासह काँग्रेसच्‍या अनेक नेत्‍यांची ट्‍विटर अकाउंट लॉक केली आहेत. या कारवाईविरोधात राहुल गांधी यांनी एक व्‍हिडिओ प्रसिद्‍ध करत टीका केली होती. ट्‍विटरचे धोरण पक्षपाती आहे. हा लोकशाहीविरोधातील हल्‍ला आहे. माझे समर्थन करणार्‍या लाखो नागरिकांचा अपमान झाला आहे.

केंद्र सरकारच्‍या आदेशाने अमेरिकेची कंपीनी ट्‍विटर राजकीय प्रक्रियेमध्‍ये दखल देत आहे. ट्‍विटरने केलेली कारवाई ही भारतीय लोकशाहीवर हल्‍ला आहे. एक राजकीय नेता हा केवळ माझ्‍यावर हल्‍ला नाही तर माझे १९ ते २० दक्षलक्ष फॉलोअर्स यांनाही आपले विचार व्‍यक्‍त करण्‍यापासून रोखण्‍यात आले आहे, असे राहुल गांधी यांनी म्‍हटले होते.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ : नागपंचमी स्पेशल : आरेच्या जंगलात साप एक थ्रिलिंग अनुभव !

 

Back to top button