कोरोना नियम न पाळणार्‍यांना विमानातून हाकलून द्या : हायकोर्ट | पुढारी

कोरोना नियम न पाळणार्‍यांना विमानातून हाकलून द्या : हायकोर्ट

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : दिल्ली उच्च न्यायालयाने विमानतळावर आणि विमानामध्ये कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यवाहक सरन्यायाधीश विपिन साघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, विमानतळावर आणि विमानात मास्क न घालणार्‍यांना दंड ठोठावण्यात यावा. कोणी नियमांचे पालन केले नाही तर त्याला विमानतळ किंवा विमानातून हाकलून द्यावे, असेही न्यायालयाने बजावले आहे.

विमान प्रवासादरम्यान कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर हा निकाल न्यायालयाने दिला आहे.

Back to top button