वेळेआधीच कोरोनावर विजयाचा जल्‍लोष साजरा केला; सोनिया गांधींची टीका | पुढारी

वेळेआधीच कोरोनावर विजयाचा जल्‍लोष साजरा केला; सोनिया गांधींची टीका

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात कोरोना विषाणूमुळे बिघडत चाललेल्‍या परिस्‍थितीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सोनिया गांधी यांनी केंद्राने वेळेआधीच कोरोनावर विजयाचा जल्‍लोष साजरा केल्‍याचा आरोप केला. पुढे बोलताना त्‍यांनी सरकारने आता फक्‍त लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्‍याचे म्‍हटले आहे.  

अधिक वाचा : ‘सोशल मीडियातून वैद्यकीय मदत मागणाऱ्यांवर कारवाई केल्यास न्यायालयाचा अवमान समजला जाईल’!

एका इंग्रजी वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी म्‍हटले आहे की, केंद्र सरकारने घाईतचं कोरोनावर विजय मिळवल्‍याचे सांगितले. इतकेच नाही तर, त्‍यांनी संसदेच्या स्‍थायी समितीने दिलेल्‍या सल्‍ल्‍यांकडेही दुर्लक्ष केले. ज्‍यामध्ये कोरोनापासून लढण्यासाठी तयार राहण्यास सांगितले होते. या सर्व संभाव्य धोक्‍यांचा विचार न करताच अनेक सुपर स्‍प्रेडर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्‍याचा आरोप त्‍यांनी यावेळी केला. 

अधिक वाचा : नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव? 

सोनिया गांधी यांनी पुढे बोलताना फेब्रुवारी महिण्याच्या सुरूवातीलाच भारत आणि परदेशातील सरकारी आरोग्‍य तज्ञांनी देशातील परिस्‍थिती बिघडण्याचा इशारा दिला होता. मात्र यावेळी सरकार दुसऱ्या कामात व्यस्‍त होते. ही वेळ राजकारण करण्याची नसून काम करण्याची आहे. पंतप्रधानांना जर श्रेय घ्‍यायचे असेल तर ते त्‍यांनी घ्‍यावे. यामध्ये नवे असे काही नसेल, मात्र कोणतेतरी पाऊल उचलावे असे सोनिया गांधी योनी म्‍हटले आहे. 

अधिक वाचा : शरीरसौष्ठवपटू जगदीश लाडचे कोरोनाने निधन

पुढे बोलताना त्‍यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्‍या अनुभवाच्या आधारे पंतप्रधान मोदी यांना सल्‍ला देण्यासाठी पत्र लिहिले होते, मात्र यावर पंतप्रधानांकडून कोणतेही उत्‍तर आले नाही. याउलट आरोग्‍य मंत्र्यांनी काँग्रेसवरच टीका केली. 

Back to top button