निवडणूक : एक्झिट पोल नेमका कसा ठरतो?  | पुढारी

निवडणूक : एक्झिट पोल नेमका कसा ठरतो? 

पुढारी ऑनलाईन डेस्क

एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे ४ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तामिळनाडूत सत्तापरिवर्तन होणार, पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे जाणार, बंगालमध्ये ममतादिदींचा करिश्मा असणार, आसाममध्ये एनडीए आणि युपीएमध्ये चांगलीच चूरस असणार, पुद्दूचेरीमध्ये मोदींचा करिश्मा दिसणार, अशा मथळ्यांच्या अनेक बातम्या तुम्ही प्रसार माध्यमांतून वाचल्या असतील. पण, मतमोजणी होण्यापूर्वी हे एक्झिट पोलवरून हे ठरवलं गेलं. तर हा एक्झिट पोल कसा काढतात? एक्झिट पोल आणि ओपीनियन पोलमध्ये कोणता फरक आहे, हे जाणून घेऊ…

वाचा ः जन की बात ‘एक्झिट पोल’मध्ये राहुल – तेजस्वींची जोडी वाढून 

एक्झिट पोल म्हणजे काय? 

निवडणुका पार पडल्यानंतर ‘एक्झिट पोल’ घेण्यात येतो. आपल्या देशात संपूर्ण मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला की, एक्झिट पोल जाहीर केला जातो. ज्या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होते, त्याच दिवशी मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. म्हणजे काय… तर, प्रत्यक्ष मतदाराला विचारलं जातं की, कुणाला मतदान केलं? त्यापूर्वी संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहे याची माहिती घेतलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्राची निवड केंद्राची निवड केलेली असते. मतदान करून आलेल्या पंधराव्या किंवा विसाव्या माणसाला नमुना म्हणून निवडलं जातं. त्यांनी दिलेल्या उत्तरांचा सर्वे केला जातो. त्याआधारे संबंधित मतदारसंघात कोण बाजी मारणार याचा अंदाज व्यक्त केला जातो. 

वाचा ः #ExitPolls LIVE : मोदी-शहांनी बंगालमध्ये तंबू ठोकूनही सीएम ममता बाजी मारणार! एक्झिट पोलचा अंदाज

ओपिनियन पोल म्हणजे काय?

याचं सरळ साधं उत्तर द्यायचं झालं तर, मतदान होण्यापूर्वी जनमतांची चाचणी घेतली जाते. या चाचणीलाच ओपिनियन पोल म्हणतात. सहाजिकच ओपिनियन पोल हा मतदानापूर्वीच जाहीर केला जातो. यामध्ये होतं काय, तर मतदान होण्यापूर्वी मतदारसंघांमध्ये जाऊन मतदाराशी चर्चा करून किंवा प्रश्न उत्तरे करून त्यांचा सर्वसाधारण कल जाणून घेतला जातो. त्यालाच जनमत चाचणी म्हंटले जाते. त्या चाचणीवरून ओपिनियन पोल ठरवला जातो. 

वाचा ः #ExitPolls : बंगालमध्ये ममतांचा दबदबा कायम! केरळात पुन्हा डावे; तमिळनाडूत सत्तांतराची चिन्हे! 

दोन्ही पोलमध्ये नेमका फरक काय?

मतदानाआधी घेतलेला पोल आहे ओपिनियन पोल असतो. तर, मतदानानंतर घेतलेला पोल हा एक्झिट पोल असतो. मतदान होण्याआधी जनमत चाचणी घेऊ जाहीर केलेला ओपिनियन पोल हा बदलण्याची शक्यता जास्त असते. मतदानानंतर प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधल्यानंतर जो पोल जाहीर केला जातो त्याला एक्झिट पोल म्हणतात. दोन्हीपैकी जास्त विश्वास ठेवायचा झाला तर, एक्झिट पोलवर ठेवला जातो. मात्र, दोन्ही पोल हे व्यक्त केलेले अंदाजच असतात.

Back to top button