कोरोना विषाणू खात्म्यासाठी लवकरच सुपरव्हॅक्सिन | पुढारी

कोरोना विषाणू खात्म्यासाठी लवकरच सुपरव्हॅक्सिन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगातील अनेक देशांत वेळोवेळी स्वतःमध्ये जनुकीय बदल घडवून आपले रूप (म्युटेड व्हेरियंट) बदलणार्‍या महाभयंकर कोरोना विषाणूवर सुपरव्हॅक्सिनच्या रूपात एकच रामबाण उपाय अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी शोधला आहे. सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंचा नायनाट करणारे सुपरव्हॅक्सिन लवकरच येत आहे. सध्या त्याची मानवी चाचणी सुरू आहे. 

हे सुपरव्हॅक्सिन एकदाच वापरले की, कोरोनापासून पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. त्यानंतर कोरोना विषाणूने कितीही वेळा आपले रूप (म्युटेंट व्हेरियंट) तरी त्याची कोणतीही बाधा लस घेणार्‍या व्यक्तीला होणार नाही, एवढी प्रभावशाली ही सुपरव्हॅक्सिन असेल.

अमेरिकेच्या यूव्हीए हेल्थ सेंटरचे शास्त्रज्ञ स्टीव्हन एल. झेचनेर आणि व्हर्जिनिया टेकचे झियांग-जिन मेंग यांनी कोरोनाविरोधातील या सुपरव्हॅक्सिनचा शोध लावला आहे. या लसीची चाचणी यशस्वी ठरली तर ते  कोरोना व्हायरसचे सर्व रूप, त्यातील जनुकीय बदल आणि स्ट्रेनचा सामना करू शकणार आहे. 

Back to top button