एप्रिल महिन्यात तब्बल ६६ लाख जण कोरोनाच्या विळख्यात! | पुढारी

एप्रिल महिन्यात तब्बल ६६ लाख जण कोरोनाच्या विळख्यात!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशाच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने किती हाहाकार माजवला आहे हे आकडेवारीतून समोर आले आहे. एप्रिल महिन्यात देशात कोविडचे तब्बल ६६लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी साथीच्या रोगाची लागण झाल्यापासून हा सर्वांत वाईट महिना ठरला. एप्रिल महिन्यात नोंदविण्यात आलेली नवीन प्रकरणे गेल्या सहा महिन्यांत नोंदवलेल्या घटनांपेक्षा जास्त होती, जी संसर्गाच्या दुसर्‍या लहरीची तीव्रता दर्शवतात.

अधिक वाचा : गुजरातमधील कोविड सेंटरमध्ये अग्नितांडव; १८ जणांचा होरपळून मृत्यू 

२२ एप्रिलपासून तीन लाखांहून अधिक प्रकरणे

देशात ५ एप्रिलपासून दररोज एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदविण्यास सुरुवात झाली. हाच आकडा १५ एप्रिलपासून त्यांची संख्या दोन लाखांवर गेली आणि २२ एप्रिलपासून दररोज तीन लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, गेल्या चार आठवड्यांत दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.

अधिक वाचा : रेमडेसिवीरच्या साडेचार लाख कुप्यांची आयात करण्याचा निर्णय

गेल्या २४ तासांत ३.८६ लाख नवीन प्रकरणे

गेल्या २४ तासांत देशात ३.८६ लाखांहून अधिक जणांना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. आजपर्यंत संक्रमित लोकांची संख्या मार्चअखेरपर्यंत १ कोटी २१ लाख ४९ हजार ३३५ होती. हाच आकडा वाढून एप्रिल अखेरपर्यंत १ कोटी ८७ लाख ६७ हजार ९६२ वर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने एप्रिलपासून संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढ झाल्याचे म्हटले आहे. 

अधिक वाचा : ‘सोशल मीडियातून वैद्यकीय मदत मागणाऱ्यांवर कारवाई केल्यास न्यायालयाचा अवमान समजला जाईल’!

Back to top button