24 तासांत देशात २ हजार ७४५ कोरोनाबाधितांची भर | पुढारी

24 तासांत देशात २ हजार ७४५ कोरोनाबाधितांची भर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात मंगळवारी दिवसभरात २ हजार ७४५ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ६ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान २ हजार २३६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा दैनंदिन संसर्गदर ०.६०% आणि आठवड्याचा संसर्गदर ०.६३% नोंदवण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ३१ लाख ५८ हजार ८७ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २६ लाख १७ हजार ८१० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात मिळवली आहे. तर,१८ हजार ३८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार ६३० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

दरम्यान लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९३ कोटी ५७ लाख २० हजार ८०७ डोस लावण्यात आले आहेत. यातील १२ ते १४ वयोगटातील बालकांना ३.४० कोटींहून अधिक पहिला डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ कोरोना डोस पैकी १५ कोटी २९ लाख ७५ हजार ४८० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८५ कोटी ८ लाख ९६ हजार ६०६ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ५५ हजार ३१४ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे

हेही वाचलंत का ? 

Back to top button