Fertilizer : दुकानदार खत संपल्‍याचे सांगतोय, त्याचाकडील 'साठा' असा तपासा... - पुढारी

Fertilizer : दुकानदार खत संपल्‍याचे सांगतोय, त्याचाकडील 'साठा' असा तपासा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकरी मशागतीसाठीच्या तयारीला ज्यावेळी लागतो, त्यावेळी खतांच्या (Fertilizer) खरेदीसाठी जात असतो. यावेळी शेतकरी आपल्याला खते मिळतील या अपेक्षेने आपली पुढली धोरणे आखत असतो परंतु खुपवेळा शेतकऱ्या खतांच्या दुकाणातून रिकाम्या हाताने परतावे लागत असते.यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते.

दुकानात गेल्यावर खताचा साठा शिल्लक नसल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात येते. परंतु खताचा (Fertilizer) स्टॉक शिल्लक असताे की  दुकानदार स्टॉक करून खतांचा भाव वाढवण्याच्या प्रयत्नात असतो.

यासाठी आपल्याला खते खरच त्या दुकानात संपली आहेत का हे पहायचे असेल तर याची माहिती असणे महत्त्‍वाचे ठरते.

शेतकऱ्यांनी आता जागरूक राहून खतांच्या साठ्याबाबत माहिती ठेवणे गरजेचे आहे.

आपण खते घेत असलेल्या दुकानात आजच्या दिवशी खतांचा किती साठा उपलब्ध आहे, हे जाणून घेणं महत्वाचे आहे.

यासाठी तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार नाही तर आपल्याच मोबाईवर अवघ्या काही मिनिटांत ही माहिती मिळू शकते.

खताचा उपलब्ध साठा कसा बघायचा?

साठवणूक केलेली रासायनीक खते
साठवणूक केलेली रासायनीक खते

केंद्र सरकार खत मंत्रालयाकडून याबाबत आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकते.

केंद्र आणि राज्य सरकारकडून खताच्या साठ्याविषयी कोणत्या दुकानात खताचा किती साठा शिल्लक आहे, याची माहिती दररोज अपडेट करत असते.

यासाठी तुम्ही fert.nic.in या वेबसाईचा आधार घ्यावा लागेल.

त्यानंतर भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होते.

या साईटवर उजवीकडील Fertilizer Dashboard या पर्यायावर क्लिक केल्यास e-Urvarak नावाचे नवीन पेज ओपन होते.

एका क्लिकवर खत साठा समजेल

या पेजवर किती शेतकरी अनुदानित दराने खताची खरेदी करतात, देशातील खत विक्रेत्यांची संख्या, महिन्याच्या १ तारखेपासून शेवटच्या दिवसांपर्यंत किती खताची विक्री झाली, याबाबत सविस्तर आकडेवारी असते. याच पेजवर उजवीकडे किसान कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला क्लिक केल्यास Retailer Opening Stock As On Today म्हणजेच आज त्या दुकानात विक्रीसाठी खताचा किती साठा उपलब्ध आहे ते तुम्ही इथं पाहू शकता.

शेतकरी

आता इथं सगळ्यांत पहिले तुमचं राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे त्या दुकानदाराचा आयडी म्हणजेच Retailer Id असेल तर तो टाकायचा आहे किंवा तो माहिती नसेल तर तुम्ही Agency Name या पर्यायासमोर दुकानाचे नाव निवडू शकता.

खतांच्या दराचीही माहिती

यापैकी कोणतीही माहिती नसेल तर तुम्ही ALL हा पर्याय ठेवून Show वर क्लिक करून जिल्ह्यातल्या कोणत्या दुकानात किती साठा शिल्लक आहे, याची माहिती पाहू शकता. दरम्यान select retailer या पर्यायाअंतर्गत तुम्ही तुमच्या भागातील दुकानाचे नाव निवडून Show या पर्यायावर क्लिक केल्यास त्या दुकानात खताचा साठा शिल्लक आहे की नाही लगेच समजू शकेल.

त्यानंतर इथं असलेल्या RETAILER ID वर तुम्ही क्लिक केलं की, या विक्रेत्याकडे कोणत्या कंपनीच्या खताचा किती साठा उपलब्ध आहे आणि त्याचा दर किती आहे त्याची सविस्तर माहिती पाहायला मिळते.

अशाच प्रकारे तुम्ही या विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या इफ्को, स्मार्टकेम म्हणजेच महाधन, आयपीएल आणि इतर कंपन्यांच्या खताचा किती साठा उपलब्ध आहे आणि त्याचा दर काय आहे, ते इथं तुम्ही पाहू शकता.

हेही वाचलं का ? 

हे ही पाहा : 

Back to top button