'आपण भविष्य वाचवलं पाहिजे आणि तुम्ही....'  | पुढारी

'आपण भविष्य वाचवलं पाहिजे आणि तुम्ही....' 

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संघी यांनी १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाबाबत अनेक टिप्पणी केल्या. त्यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांचे पहिल्यांदा लसीकरण करणे आवश्यक होते. ते देशाचे भविष्य आहेत. पण, आपण वृद्धांना पहिल्यांदा प्राथमिकता दिली, असेही ते म्‍हणाले.  दरम्यान, न्यायालयाने आम्ही वृद्ध लोकांच्या जीवाचे काही मोल नाही असं म्हणत नाही. त्यांचा कुटुंबाला मिळणारा भावनिक आधार बहूमुल्य आहे, असेही स्पष्ट केले. 

ॲलोपॅथीनंतर रामदेव बाबांचा ज्‍योतिष्‍यांवर हल्‍लाबोल

दिल्लीतील कोरोना व्यवस्थापनासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. यात औषधांची कमतरता आणि ब्लॅक फंगस यांचाही समावेश आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान,  न्यायमूर्ती संघी यांनी स्वतःचे मत व्यक्त करताना सांगितले की, ‘कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वात जास्त तरुण प्रभावित झाले. त्यांना लस मिळाली नाही, आताही लस उपलब्‍ध नाही. मला या लसीकरण मोहिमेचे धोरणच समजलेले नाही, असेही त्‍यांनी सांगितले. 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

‘मी माझे वैयक्तीक मत व्यक्त करत आहे. तुम्ही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेची घोषणा केली. पण, त्यावेळी तुमच्याकडे लसींचे डोस उपलब्धच नव्हते. मग तुम्ही लसीकरणाची घोषणा का केली? आपण भविष्याकडे पाहिले पाहिजे. आपले तरुण आपले भविष्य आहे. आपण त्यांनाच बाजूला ठेवले.आपण भविष्य सुरक्षित केले पाहिजे. त्यासाठी आपण तरुणांचे लसीकरण गरजेचे आहे. इथे आपण ६० वर्षाच्या वरच्या लोकांना प्राधान्य देत आहोत. जे त्यांचे आयुष्य जगले आहेत. तरुणांमध्ये अजून बरेच भविष्य आहे. आपण परतीच्या मार्गाला लागलो आहे.’

न्यायमूर्तींनी या कोरोनाच्या लाटेत अनेक तरुणांनी आपला जीव गमावला आहे याच्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे आपल्याला एका कुणाची तरी निवड करावीच लागणार आहे. ‘आपण आपल्या तरुणांची निवड केली पाहिजे. कारण ८० वर्षाच्या व्यक्तीने आपले आयुष्य जगले आहे. ते देशाला पुढे नेऊ शकत नाहीत.’

न्यायमूर्ती म्हणाले ‘तसा विचार केला तर आपण सर्वांना वाचवण्यास सक्षम असले पाहिजे. पण, जर तुम्हाला निवड करायची असेल तर तुम्ही तरुणांना प्राधान्य दिले पाहिजे.’ ज्यावेळी केंद्राचे सल्लागार आता आपल्याला फक्त देवच वाचवू शकतात असे म्हणाले, त्यावेळी न्यायमूर्तींनी हे संकट असे आहे की जिथे आपण काही हालचाल केली नाही तर आपल्याला देवही वाचवू शकत नाही. 

फायझर, मॉडर्नाची लस लवकरच भारतात, स्‍वतंत्र चाचणी नाही 

न्यामूर्ती संघी म्हणाले, ‘तुम्ही इतके संकुचित का होत आहात? संकटकाळात पुढचा मार्ग काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. इतर देशांनी ते केलं. इटलीमध्‍ये वृद्ध लोकांना सांगितले की क्षमा करा आमच्याकडे बेड शिल्लक नाहीत.’ 

 

Back to top button