पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढीचा दणका सुरुच! पेट्रोल, डिझेलच्या दरात आणखी वाढ | पुढारी

पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढीचा दणका सुरुच! पेट्रोल, डिझेलच्या दरात आणखी वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज (शुक्रवार) पेट्रोल व डिझेल दरात वाढ केली. पेट्रोल दरात 27 पैशांची वाढ झाली असून डिझेल दरात 28 पैशांची वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रती लीटरचे दर 94.76 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 85.66 रुपयांवर गेले आहेत. 

अधिक वाचा : महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही : बाळासाहेब थोरात 

गेल्या काही दिवसात जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर वधारले आहेत. परिणामी इंधन दरात दरवाढ सुरू आहे. ब्रेंट क्रूडचे प्रती बॅरलचे दर 71 डॉलर्सवर गेले आहेत. इंधन दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे लीटरचे 100.98 रुपयांवर तर डिझेलचे दर 92.99 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर क्रमशः 94.76 आणि 88.51 रुपयांवर आणि चेन्नई येथे क्रमशः 96.23 आणि 90.38 रुपयांवर गेले आहेत. 

अधिक वाचा : अशोक सराफ यांना मामा नाव कसे पडलं?

अन्य शहरांचा विचार केला तर भोपाळमध्ये पेट्रोल 102.89 व डिझेल 94.19 रुपयांवर गेले आहेत. पाटणा येथे हेच दर क्रमशः 96.90 आणि 90.94 रुपयांवर गेले आहेत. लखनौ येथे इंधन दर क्रमश 92.04 आणि 86.05 रुपयांवर गेले आहेत तर बंगळुरू येथे हे दर क्रमशः97.92 आणि 90.81 रुपयांवर गेले आहेत.  

Back to top button