पीएम मोदींना ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड | पुढारी

पीएम मोदींना ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा :  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण ठार मारणार आहोत, अशी धमकी देणाऱ्या एका विकृत व्यक्तीस दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात धमकी देणाऱ्या खजुरी खास येथील सलमान उर्फ अरमान या व्यक्तीची दिल्ली पोलीस सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी वरून ही धमकी देण्यात आली होती.

वाचा : रिझर्व्ह बँकेचे पतधोरण सोयीस्कर; बँकींग तज्ज्ञ किरण कर्नाड यांचे प्रतिपादन

तुरुंगात जायाचे असल्यामुळे आपण अशा प्रकारचा धमकीचा फोन केला होता, असे आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे. हत्या प्रकरणात २०१८ साली बालसुधारगृहात पाठविण्यात आलेला हा आरोपी अमली पदार्थांच्या आहारी गेला असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

वाचा : यूपीमध्ये जोखीम घेण्यास तयार नाही भाजप; योगी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

पोलिस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर दूरध्वनी करून आरोपीने पंतप्रधानांना ठार मारणार असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी या दूरध्वनी क्रमांकांचा शोध घेवून तात्काळ सलमानच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांना फोन करण्यापूर्वी स्मॅक (अंमली पदार्थ) घेतल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

Back to top button