चोक्सीला अटक न करताच परतले भारतीय अधिकारी | पुढारी

चोक्सीला अटक न करताच परतले भारतीय अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूकप्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी डोमिनिकाला गेलेले भारतीय अधिकार्‍यांचे पथक त्याच्या अटकेशिवाय मायदेशी परतले आहे. देशात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिकामध्ये चोक्सीला अटक करण्यात आली आहे. डोमिनिकातून चोक्सीचे थेट प्रत्यार्पण व्हावे, यासाठी हे अधिकारी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना यश आले नाही. 

28 मे रोजी भारतीय अधिकार्‍यांचे पथक डोमिनिकात दाखल झाले होते. पथकात सीबीआयचे 2 अधिकारीही होते. मेहुल चोक्सीला किमान महिनाभर अजून डोमिनिकातच राहावे लागेल. सध्या तो तेथे रुग्णालयात दाखल आहे. 

मेहुलविरुद्ध दोन प्रकरणांत स्थानिक कोर्टात सुनावणी सुरू आहे. ती पूर्ण होत नाही तोवर मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण अशक्य आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Back to top button