नितीन गडकरी 'बिग-बी'वर खवळतात तेव्हा... | पुढारी

नितीन गडकरी 'बिग-बी'वर खवळतात तेव्हा...

पुढारी ऑनलाईन डेल्क : नितीन गडकरी राजकारणातील अजात शत्रू असलेले व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गडकरी कधीच विरोधी पक्षावर चिडलेले, रागावलेले आणि टोकाची टीका करणारे दिसलेले नाही. त्यांचा मनमिळावू स्वभाव राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. कामाचा व्याप आणि तो पूर्ण करण्यासाठी असलेला गडकरीचा अट्टाहास सर्वांनाच प्रसिद्ध आहे. पण, त्यांनी प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांना थेट ‘नाटक मत कर, चल रख फोन’, असं म्हणत बिग-बीचा चक्क कट केला होता.

एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तो किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “मला एकदा बाॅलिवुडचे महान नायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांचा फोन आला होता. समोरची व्यक्ती फोनमधून म्हणाली की, ‘हॅलो, मै अमिताभ बोल रहा हूॅं.’ तेव्हा मला वाटले कुणीतरी माझी मस्करी करत आहे. म्हणून मी देखील ‘नाटक मत कर, रख निचे फोन’, अशा पद्धतीने मी बोलून फोन कट केला होता.”

“नंतर पुन्हा मला फोन आला. तो पुन्हा आवाज फोनमधून आला. त्यावेळी अमिताभजींनी सांगितलं की,  खरोखरच अमिताभ बच्चन बोलत आहे. पलिकडच्या व्यक्तीने गांभीर्याने सांगितल्यानंतर मला माझी चूक लक्षात आली”, अशी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतची आठवण नितीन गडकरी यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

Back to top button