का रे हा दुरावा? पीएम मोदी, अमित शहांनी सीएम योगींना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्याच नाहीत!  | पुढारी

का रे हा दुरावा? पीएम मोदी, अमित शहांनी सीएम योगींना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्याच नाहीत! 

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : तुम्हाला जर यूपीमध्ये रहायचे असेल तर तुम्हाला योगी-योगी म्हणावे लागेल. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गोरखपूरमधून निघालेला हा नारा योगी आदित्यनाथांच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक होता. योगींनी शनिवारी आपला ४९ वा वाढदिवस हिंदू हृदयसम्राटांच्या प्रतिमेसह साजरा केला. 

तथापि या वाढदिवसाची एक सल सीएम योगींच्या मनात नक्की असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी ट्विटरवर योगींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्याच नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भूवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे दिल्लीचे ‘महाराजां’बरोबर खूश नसल्याची अटकळही तीव्र होऊ लागली आहे. मात्र, याबाबत भाजपने स्पष्टीकरण सादर केलं आहे.

मोदी, शहा, नड्डा कोणीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सीएम योगींना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच नाहीत. याबद्दल ट्विटरवर बरीच चर्चा आहे. असे म्हटले जाते की असे दिसते की दिल्ली यूपीवर म्हणजेच योगी आदित्यनाथ यांच्यावर खुश नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा ट्विटरवर आपल्या सरकारचे मंत्री, पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना शुभेच्छा देतात, पण पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर मुख्यमंत्री योगी यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. पीएम मोदींनी फोन करून शुभेच्छा दिल्याचा दावा भाजपने केला आहे. 

खरं तर उत्तर प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. या चर्चेबरोबरच उत्तर प्रदेशात नेतृत्व बदलाच्या चर्चेने मोठी राजकीय उलथापालथ होईल असे बोलले जात होते. तथापि, असे काहीही झाले नाही आणि योगींची खुर्ची अबाधित राहिली. या बरोबरच संघटनेचे मंत्री बी.एल. संतोष यांनीही (योगी आदित्यनाथ) लखनौहून जाताना कोरोनाशी लढण्याबद्दल पाठ थोपटली.

Back to top button