काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली | पुढारी

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनासदृश्य लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना दिल्लीनजीकच्या गुरुग्राम येथील मेदान्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आला होता, त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले कमलनाथ गेल्या फेब्रुवारी महिन्यात लिफ्ट अपघातातून दैव बलवत्तर असल्याने बचावले होते. मात्र अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर कोरोनाचे संकट असूनही कमलनाथ सक्रिय आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना नवा स्ट्रेन हा भारतीय स्ट्रेन असल्याचे सांगितल्यानंतर कमलनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. केंद्रात अनेक मंत्रालयाचा कार्यभार सांभाळलेले कमलनाथ २०१८ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर एका वर्षातच त्यांचे सरकार पडले होते. 

Back to top button