रेमडेसिव्हीर देऊ नये! कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी | पुढारी

रेमडेसिव्हीर देऊ नये! कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारने कोरोना बाधित मुलांच्या उपचारासंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोरोना संक्रमित मुलांना अँटी-व्हायरल रेमडेसिव्हीर देऊ नये अशी स्पष्ट सूचना त्यामध्ये करण्यात आली आहे. मुलांना स्टेरॉइड देखील टाळले पाहिजेत. तसेच मुलांच्या शारीरिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी ६ मिनिटांची चालण्याची चाचणी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत असताना ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे.

अधिक वाचा : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले तरी डेल्टा व्हेरियंटची लागण होतेच 

मंत्रालयाने असे म्हटले आहे की मुलांवर अँटी व्हायरल औषध रेमडेसिव्हीर वापरण्याची शिफारस केलेली नाही. त्याच वेळी, रुग्णालयात देखरेखीच्या वेळी केवळ अधिक गंभीर रुग्णांना स्टेरॉइड दिले पाहिजे असे आदेशात म्हटले आहे. आपत्कालीन वापरासाठी रेमडेसिव्हीर औषधाला मंजुरी आहे.  

दरम्यान, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये त्याच्या वापराची सुरक्षा आणि परिणामकारकता याबद्दल डेटा अद्याप उपलब्ध नाही. कोरोना बाधित मुलांच्या शारीरिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने ६ मिनिटांची वॉक टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन त्यांच्यावर कार्डियो-पल्मोनरी एक्सरसाइज सहनशीलतेचे मूल्यांकन केले जाऊ शकेल.

अधिक वाचा : अंबानी-अदानींनी श्रीमंतांच्या यादीत जॅक मासह चीनी उद्योगपतींनाही टाकले मागे

मंत्रालयाने म्हटले आहे की, लहान मुलांच्या बोटावर पल्स ऑक्सिमीटर बसवावेत आणि त्यांना खोलीमध्येच ६ मिनिटे सतत चालण्यास सांगितले पाहिजे. जर या काळात ऑक्सिजन सॅच्युरेशन ९४ टक्क्यांपेक्षा खाली आल्यास किंवा ३ ते ५ टक्के घसरल्यास म्हणजेच श्वास घेताना अडचण दिसून येत असेल तर त्या आधारावर मुलांच्या रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. परंतु ज्यांना दम्याचा त्रास आहे अशा मुलांसाठी ही चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) मुलांच्या बाबतीत सीटी स्कॅनबाबत सल्ला दिला आहे. हाय रिझोल्यूशन सीटी (एचआरसीटी) चा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. मार्गदर्शक पत्रकात असे म्हटले आहे की कोविड रोग तीव्र असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू करावी.

अधिक वाचा : ते लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप : नुसरत जहां

Back to top button