'फायजर, मॉडर्नाच्‍या लसींसाठी मोजावे लागणार पैसे' | पुढारी

'फायजर, मॉडर्नाच्‍या लसींसाठी मोजावे लागणार पैसे'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: फायझर, मॉडर्ना यासारख्या विदेशी कंपन्यांच्या कोरोनावरील लसी लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार असल्या तरी या लसींसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. लसीकरण कार्यक्रमात वरील कंपन्यांचा समावेश केला जाणार नसल्याने या लसी घेऊ इच्छिणाऱ्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे शनिवारी  सरकारी सूत्रांनी सांगितले. 

अधिक वाचा : कोव्हॅक्सिन कोव्हिशिल्डपेक्षा इतकी महाग का आहे? 

 येत्या जुलै महिन्यापर्यंत फायझरची लस भारतात उपलब्ध होऊ शकते. दोन्ही कंपन्यांच्या लसीची किंमत इतर कंपन्यांच्या लसीपेक्षा जास्त आहे. खासगी रुग्णालयात त्या उपलब्ध असतील. 

अधिक वाचा : पहिला डोस कोव्हक्सीनचा, दुसरा स्पुटनिक किंवा कोविशिल्डचा? मिक्स-अँण्ड-मॅचचा विचार!

फायझर आणि मॉडर्नाच्या लसी सरकारी केंद्रात उपलब्ध न होण्याचे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे, कोल्‍ड चेन मॅनेजमेंट. दोन्ही लसींची साठवणूक शून्यापेक्षा कमी अंश सेल्सिअस तापमानात करावी लागते. अशा प्रकारची साठवणूक क्षमता फक्त मोठ्या खाजगी रुग्णालमध्येच असते. सरकारला जर वरील लसींचा समावेश करायचा असेल तर तत्पूर्वी व्यापक प्रमाणावर कोल्‍ड चेनमध्ये गुंतवणूक करावी लागेल आणि इतक्या कमी वेळेत हे शक्य नाही. महाग लसी खरेदी करणे तार्किक नसल्याचे देखील या लसी सरकारी कार्यक्रमात सामील होण्याची शक्यता कमी आहे. 

Back to top button