२८० किलोंचा पोषाख घालणारे महाराणा प्रताप यांच्याबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या... | पुढारी

२८० किलोंचा पोषाख घालणारे महाराणा प्रताप यांच्याबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क ; इतिहासाच्या पानांमध्ये एक हिंदू पराक्रमी राजा म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याचं नाव महाराणा प्रताप. त्यांनी प्रबळ मुघलांशी दिलेली टक्कर आजही इतिहास विसरू शकलेला नाही. २० हजार सैन्य घेऊन ८५ हजार सैन्य असलेल्या मुघलांना नाकी नऊ आणणारे पराक्रमी महाराणा प्रताप, यांच्या आयुष्यातील इन्टरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊ या…

महाराणा प्रताप जेव्हा युद्धासाठी निघायचे, तेव्हा शत्रूपासून स्वतःचं सरंक्षण करण्यासाठी अंगावर जे कवच परिधान करायचे, त्याचं वजन तब्बल ७२ किलोचं होतं. युद्धात शत्रूचा पराभव करण्यासाठी जो भाला वापरत होते, त्याचं वजन सुमारे ८१ किलो होते. म्हणून एक युद्धातला पोषाख (ढाल, भाला, कवच आणि तलवार) यांचं एकूण वजन तब्बल २०८ किलो होते. 

महाराणा प्रताप यांना लहानपणी ‘किका’ नावाने बोलावलं जायचं. त्यांच्याकडे खूप इमानदार आणि धाडसी घोडा होता, त्याचं नाव ‘चेतक’ असं होतं. 

१८ जून १५७६ रोजी जी हल्दीघाटीमध्ये बादशहा अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये लढाई झाली, ती इतिहासातील सर्वात विनाशकारी युद्ध मानले जाते. इतिहासकार तर, त्याला महाभारताचे युद्ध मानतात. 

हल्दीघाटीच्या लढाईत बादशहा अकबराकडे ८५ हजार सैन्य होतं आणि महाराणा प्रताप यांच्याकडे केवळ २० हजार; पण तरीही महाराणा प्रताप यांनी अकबराला कडवा विरोध केला. शेवटी या लढाई निकालच लागला नाही. यामध्ये अकबर जिंकला नाही की, न महाराणा प्रताप यांचा पराभव झाला. 

शेवटी बादशहा अकबरने हे युद्ध शांतीपूर्ण मार्गानं समाप्त करण्यासाठी ६ माणसांना महाराणा प्रताप यांच्याकडे पाठवलं. पण, करारी महाराणा प्रताप यांनी त्याचा प्रस्ताव फेटाळला. 

असं सांगितलं जातं की, महाराणा प्रताप युद्धात घायाळ झाले अन् मुघलांची सेना त्यांचा पाठलाग करायला लागले, तेव्हा त्यांच्या इमानदार चेतक घोड्याने महाराणा प्रताप यांना आपल्‍या पाठीवर झोपवून मोठ्या नाल्याला पार केले. याच कारणासाठी आजही तिथे चेतक घोड्याची समाधी आहे. 

महाराणा प्रताप यांनी एकूण ११ लग्नं केलेली होती. ती सर्व लग्नं राजकारणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली होती. ११ पत्नींपासून १७ मुलं आणि ५ मुलींची जन्म झालेला होता. म्हणजे महाराणा प्रताप हे २२ मुलांचे वडील होते. 

महाराणा प्रताप यांनी अकबराला बादशहा मानण्याचा प्रस्ताव ६ वेळा फेटाळून लावला होता. कारण, त्यांना विदेशातून आलेले राज्यकर्ते मान्य नव्हते. पण, त्यांचा मृत्यूननंतर त्‍यांच्‍या मुलाने मेवाड अकबराला सोपविले.

Back to top button