प्रक्षोभक भाषणप्रकरणी दिल्‍ली भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांना अटक | पुढारी

प्रक्षोभक भाषणप्रकरणी दिल्‍ली भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांना अटक

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : जंतर -मंतरवर   केलेल्‍या प्रक्षोभक भाषण प्रकरणी दिल्ली भाजपचे माजी प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील अश्विनी उपाध्याय यांना पोलिसांनी अटक केली. उपाध्याय यांच्याशिवाय अन्य पाचजणांवरही अटकेची कारवाई झाली आहे.

धार्मिक द्वेष पसरविणारे भाषण देणे तसेच घोषणाबाजी केल्याबद्दल वकील अश्विनी उपाध्याय व अन्य आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाले आहे.

व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास करून आरोपींची ओळख निश्चित केली व त्यांना ताब्यात घेतले. उपाध्याय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास असंख्य लोक उपस्थित होते. चले जाव आंदोलनाला 79 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रॅली काढण्यात आली होती. यावेळी इंग्रज काळातील कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे काही लोकांनी प्रक्षोभक भाषणे दिली होती.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

बदलती शिक्षण पद्धती स्वीकारा – डॉ. अरुण पाटील

Back to top button