भारतीय तटरक्षक दलात इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; शेकडो रिक्त जागांसाठी निघाली भरती | पुढारी

भारतीय तटरक्षक दलात इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; शेकडो रिक्त जागांसाठी निघाली भरती

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: भारतीय तटरक्षक दलाने २०२१ साठी नाविक आणि यांत्रिक पदाच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यातंर्गत जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD), नाविक देशांतर्गत शाखा (DB) आणि मेकॅनिकल या पदासाठी ही भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयसीजीच्या (ICG)  अधिकृत संकेतस्थळावर joinindiancoastguard.gov.in वर भेट देऊन विहित नमुन्यात अर्ज करु शकतात.

अधिक वाचा : नौदलात सेवेची उत्तम संधी

भारतीय तटरक्षक दलाने आयोजलेल्या या भर्तीसाठी ऑनलाईन अर्ज ०२ जुलैपासून सुरु होतील. तर पात्र उमेदवार १६ जुलै २०२१ रोजी किंवा त्यापूर्वीच विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. अधिसूचनेसंदर्भात खाली डायरेक्ट लिंक दिली आहे.

रिक्त पदांचा तपशील : भारतीय तटरक्षक दल जीडी रिक्रूटमेंट २०२१ च्या माध्यमातून विविध पदांवर एकूण ३५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

नविक (जनरल ड्यूटी) – २६० पदे

नविक (देशांतर्गत शाखा) – ५० पदे

यांत्रिकी – २० पदे

यांत्रिकी (इलेक्ट्रिकल) – १३ पदे 

यांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स) – ०७ पदे 

अधिक वाचा : बारावीनंतर करू शकता नोकरी आणि व्यवसायाची खात्री देणारे ‘हे’ ५ कोर्स!

प्रशिक्षण केंव्हा व कोठे होईल?

नाविक (जीडी) व यांत्रिकी अशी निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे मूळ प्रशिक्षण फेब्रुवारी २०२२ पासून आयएनएस चिल्का येथे सुरू होईल. तर नविक (देशांतर्गत शाखा) चे प्रशिक्षण एप्रिल २०२२ मध्ये होणार आहे. 

अधिक वाचा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये नोकरीची संधी

कोण करू शकतो अर्ज?

नविक (जनरल ड्यूटी) : उमेदवाराचे शालेय शिक्षण हे काऊंसिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एजुकेशन (COBSE) मान्यता प्राप्त शाळेत झालेले असावे. तसेच गणित व भौतिकशास्त्रसह तो १२ वी उत्तीर्ण असावा. असे उमेदवाराचे अर्ज करू शकतात.

नविक (देशांतर्गत शाखा) : उमेदवाराचे बोर्ड ऑफ स्कूल एजुकेशन (COBSE) द्वारा मान्यता प्राप्त शाळेतून दहावी पास असावा. 

यांत्रिकी : बोर्ड ऑफ स्कूल एजुकेशन (COBSE) कडून मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी पास व ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) मधील अभियांत्रिकी पदविका 

अधिक वाचा : नोकरीची संधी! ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये भरती सुरू

वयोमर्यादा : १८ ते २२ वर्षे  

वेतन : नविक जनरल ड्यूटी आणि देशांतर्गत शाखा पदावर नियुक्ती होणाऱ्या पात्र उमेदवारांना वेतन पातळी- ३ अंतर्गत २१७०० बेसिक वेतनासह अन्य भत्यांचा लाभ मिळेल. तर यांत्रिकी पदासाठी बेसिक वेतन – २९२०० रुपये (वेतन पातळी-५) आणि डीएसह इतर भत्त्यांचा लाभ उपलब्ध असतील.

Back to top button