नारायण राणे दिल्लीला रवाना! मंत्रिपदाची लॉटरी लागणार? | पुढारी

नारायण राणे दिल्लीला रवाना! मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजप खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दिल्लीत सध्या मोदी कॅबिनेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणे दिल्लीत पोहोचल्याने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असेल. 

नारायणे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. हे सरकार कोसळणार असा दावा करण्यात नारायण राणे सातत्याने आघाडीवर आहेत. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने मराठा चेहरा म्हणून नारायण राणे यांना संधी दिली जाईल का? अशी चर्चा रंगली आहे.  

Back to top button