अर्थव्यवस्थेला तीन लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहानात्मक पॅकेजची गरज | पुढारी

अर्थव्यवस्थेला तीन लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहानात्मक पॅकेजची गरज

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा ; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील उद्योग-धंद्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे पॅकेज देणे आवश्यक असल्याचे उद्योगपतींची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात ‘सीआयआय’ ने म्हटले आहे.

अधिक वाचा : स्वरा भास्कर, ट्विटरविरोधात गुन्हा दाखल!

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्यापक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच जनधन योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम टाकणे देखील आवश्यक आहे. सीआयआयचे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. लसीकरण मोहिम झपाट्याने राबविण्यासाठी या क्षेत्रातील एका तज्ज्ञाची तात्काळ नियुक्ती करावी लागेल, अशी टिप्पणीही नरेंद्रन यांनी केली.

अधिक वाचा : सीबीएसईकडून इयत्ता १२ वीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला! राज्य मंडळही त्याच मार्गाने जाणार?

दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 9.5 टक्क्यांवर जाऊ शकतो, असे सांगून नरेंद्रन पुढे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा सर्वसामान्य गरीब नागरिकांना बसला आहे. या श्रेणीतील लोकांना तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारने परिस्थिती ओळखून लोकांना ही मदत करावी. 

अधिक वाचा : कोल्हापूर, मुंबईसह देशात ‘स्फुटनिक व्ही’ लस उपलब्ध होणार

भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्राहक आधारित अर्थव्यवस्था आहे. अशा स्थितीत ग्राहक मागणीला धक्का लागू नये, याची काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहनात्मक पॅकेज द्यावे. पॅकेजचा आकार वाढत असेल तर त्याचा समावेश करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आपल्या ताळेबंदाचा विस्तार केला पाहिजे.

Back to top button