...आणि मिल्खा सिंग बहिणीच्या आठवणीने रडले | पुढारी

...आणि मिल्खा सिंग बहिणीच्या आठवणीने रडले

मुंबई :  पुढारी ऑनलाईन 

शनिवारी भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या अतुलनीय कामगिरीने अजरामर झालेल्या मिल्खा सिंग यांनी आपल्या सह्रदयी स्वभावाने अनेकांना आपलेसे केले होते. भाग मिल्खा भाग या सिनेमात मिल्खा यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या दिव्या दत्ता यांनी त्यांची आठवण सांगितली असून हा सिनेमा पाहिल्यानंतर बहिणीच्या आठवणीने ते रडले होते. 

वाचा : मिल्खा सिंगनी पोटासाठी केले होते बुट पॉलिश; सैन्यदलाने मिळवून दिली ओळख 

भाग मिल्खा भाग या सिनेमात मिल्खा यांच्या मोठ्या बहिणीची भूमिका दिव्या दत्ता ने साकारली होती. मिल्खा यांच्या निधनाची बातमी समजल्यावर एका मुलाखतीमध्ये दिव्याने तिच्या आठवणींना उजाळा दिला होता.  ‘सिनेमा पूर्ण झाल्यानंतर मिल्खा यांनी हा सिनेमा आमच्यासोबत बसून पाहिला. या सिनेमात त्यांच्या मोठ्या बहिणीची भूमिका  मी साकारली होती.  ही भूमिका त्यांना खूपच आवडली होती. त्यांना माझा अभिनय इतका आवडला होती की माझा हात हातात घेऊन ते रडत होते. ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी मिल्खा यांच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले होते. मिल्खा सिंग यांचे आपल्या मोठ्या बहिणीवर खूप प्रेम होते त्यामुळेच ते खूपच भावूक झाले होते. सिनेमा साकारण्याआधी मी त्यांना भेटले तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीच्या अनेक आठवणी मला सांगितल्या. किंबहुना ते त्यात खूप रमले. त्यांचे किस्से, आठवणी खूपच हृदयस्पर्शी होत्या. त्यांचे आणि बहिणीचे नाते त्यांनी असे काही उलगडून दाखवले होते की, त्यामुळे मलादेखील ही भूमिका साकारताना मदतच झाली.’

वाचा : मिल्खा सिंग यांना ‘फ्लाइंग सिख’ नाव का पडलं?; पाकिस्तानला जोडणारी कहाणी

गोल्फचेही चाहते

दिव्या दत्ता सांगतात की, ‘भाग मिल्खा नंतर मी त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झाले. जेव्हा जेव्हा मी चंदीगढला जायचे तेव्हा त्यांच्या घरी आवर्जून जायचे. मी त्यांना फोन करायचे तेव्हा ते मला म्हणायचे,‘तू लवकर ये आपण गोल्फ खेळायला जाऊ.’ त्यांना गोल्फची खूप आवड होती. ते लगेच एखाद्याला आपलेसे करत असत. 

वाचा : मिल्खा सिंग यांच्या निधनावर फरहान अख्तर म्हणतो…

Back to top button