'कोरोना मृतांच्या वारसांना चार लाख देणे शक्य नाही' | पुढारी

'कोरोना मृतांच्या वारसांना चार लाख देणे शक्य नाही'

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केले आहे. कोरोनामुळे केद्र आणि राज्य सरकारचा महसूल कमी झाल्याने तसेच आरोग्याच्या खर्चामध्ये वाढ झाल्याने आर्थिक दडपण आहे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत याचिका दाखल करून घेत सुनावणी घेतली होती.

वाचा : जिम ट्रेनरने मुलींना पाठविले अश्‍लील व्हिडिओ

कोरोनामुळे देशभरात आत्तापर्यंत तीन लाख ८६ हजार ७१३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडे सांगतात. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून यात मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रत्येकी चार लाख रुपयाची भरपाई द्यावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे करण्यात आली होती. यावर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, ही धोरणात्मक बाब असून ती कार्यपालिकांवर सोपविली पाहिजे. याबाबत न्यायालय काहीच निर्णय देऊ शकत नाही.

वाचा : अभिनेत्रीवर बलात्‍कार; माजी मंत्री अटकेत 

आपत्ती कायद्यांतर्गत अनिवार्य भरपाई फक्त भूकंप, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत लागू आहे. तसेच, जर एखाद्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूवर अनुग्रह निधी दिला आणि दुसरीकडे नाही दिला तर ते चुकीचे ठरेल, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. प्रत्येक कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृत्यूवर नुकसान भरपाई देणे राज्यांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे आहे, असे केंद्राने स्पष्ट केले. 

वाचा : प्रशांत किशोरांच्या I-PAC चे काम कसं चालतं? ज्यांनी पीएम मोदींना जिंकून आणि हरवूनही दाखवले!

Back to top button