पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ६.३० वाजता जनतेशी संवाद साधणार  | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ६.३० वाजता जनतेशी संवाद साधणार 

नवी दिल्ली पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त जनतेशी संवाद साधणार आहेत. या बाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दिली आहे. या वर्षीचा योग दिवस हा सातवा योग दिवस आहे. आपण ७ वा योग दिवस साजरा करणार आहोत. या वर्षाची थीम योग फॉर वेलनेस आहे. जी शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर केंद्रीत आहे. सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी योग दिवसाच्या कार्यक्रमात मी संबोधित करेन असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह संबोधन दूरदर्शनसह अन्य न्यूज चॅनेल्सवर दाखवण्यात येईल. या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू हेदेखील संवाद साधणार आहेत. उद्या देशभरात योग दिन साजरा करण्यात येणार आहे. हा योग दिन कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. 

 

वाचा :शिवसेनेने भाजपशी युती करावी; रामदास आठवलेंची शिवसेनेला साद

वाचा : मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

Back to top button