कर्नाटक-महाराष्ट्र पूर नियंत्रण बैठक दरवर्षी | पुढारी

कर्नाटक-महाराष्ट्र पूर नियंत्रण बैठक दरवर्षी

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण आणि जलाशयातून पाणी सोडण्याबाबत क्षणाक्षणाची माहिती (रिअल टाइम डाटा) एकमेकांना देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाग घेतला. त्यांनी कर्नाटकातील जलाशयामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या. 

अधिक वाचा : ‘अलमट्टी’वरच होणार चर्चा महाराष्ट्र-कर्नाटक मंत्री, अधिकार्‍यांची बैठक आज बंगळुरात

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा आणि भीमा नद्यांना पूर येतो. याचा परिणाम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही गावांवर होतो. त्यावर उपाययोजना करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. 

अधिक वाचा : अलमट्टी प्रकरणी महाराष्ट्र आणि कर्नाटक समन्यवयाने निर्णय घेणार, बैठकीत निर्णय

दोन्ही राज्यांचे पाटबंधारे मंत्री सचिव, कनिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधण्यात येणार आहे दूधगंगा योजना दोन्ही राज्यांची संयुक्त योजना आहे. अनेक वर्षांपासून ही योजना रखडली आहे. आगामी दोन वर्षांत ही योजना पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

अधिक वाचा : कृष्णेच्या पुरात तरुणाची स्टंटबाजी

गृहमंत्री बसवराज मुंबई म्हणाले, अलमट्टीच्या पाण्यामुळे दरवर्षी पूर येतो, असे महाराष्ट्राचे म्हणणे आहे. यापुढे अलमट्टीमुळे नारायणपूर जलाशय पाणलोट क्षेत्रात पूर येऊ नये म्हणून अलमट्टीच्या पातळीची वेळोवेळी नोंद केली जाईल. या माहितीची देवाण-घेवाण करून वेळेनुसार कमीअधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. वीस वर्षांपासून रखडलेली दूधगंगा योजना पूर्णत्वास नेण्यात येईल.

दोन्ही राज्यांकडून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. 2013 पासून महाराष्ट्राला पाण्याच्या बदल्यात ठराविक रक्कम देण्यात येत होती. यापुढे कर्नाटक आणि पाणी सोडल्यानंतर महाराष्ट्रालाही तेवढ्याच प्रमाणात पाणी सोडावे लागेल. सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार, अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. व्ही. रमण रेड्डी, पाटबंधारे खात्याचे मुख्य सचिव राकेश सिंग आदी बैठकीला उपस्थित होते.

Back to top button