पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कठुआ-उधमपूर सीमेजवळ बुधवारी (दि.११) झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. उधमपूर जिल्ह्यात आदल्या दिवशी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या परिसरातील दहशतवाद्यांच्या घसखोरीची माहिती मिळताच निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी बसंत गडमध्ये दाखल होत त्यांनी परिसराला वेढा घातला होता.