ही तिसऱ्या आघाडीची बैठक नाही : यशवंत सिन्हा | पुढारी

ही तिसऱ्या आघाडीची बैठक नाही : यशवंत सिन्हा

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवाः भाजपला रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आज खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवसास्थानी देशातील दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील साेमवारी (दि. २१) झालेल्या बैठकीतून तिसऱ्या आघाडीच्या शक्यतांवर चर्चा सुरु आहे. यावर यशवंत सिन्हा यांनी वक्तव्य केले आहे. 

अधिक वाचा : प्रताप सरनाईक यांची उच्च न्यायालयात धाव

तृणमुल काँग्रेसचे नेते  यशवंत सिन्हा म्हणाले की, शरद पवार यांच्या निवासस्थानावर देशातील विविध नेते भेटणार आहे. मात्र यामध्ये तिसऱ्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. राष्ट्र मंच अखत्यारीत ही बैठक होणार आहे.ही बैठक शरद पवार यांच्या निवास्थानी होणार आहे. या बैठकीमध्ये तिसऱ्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा असणार नसल्याचे सिन्हा म्हणाले. राजकारण्याव्यतिरिक्त विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना या बैठकीला आमंत्रित केल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

अधिक वाचा : ‘तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल याची खात्री नाही’

दरम्यान, भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. यावर प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केले आहे. भाजपविरोधात मी तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवू शकत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा : दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत असतानाच राहुल गांधींनी बोलावली पत्रकार परिषद, काय घेणार भूमिका?

प्रशांत किशोर म्हणाले की, देशात भाजप विरोधात जाण्यासाठी तिसरी आणि चौथी आघाडी आव्हान देईल का? यावर मला शंका आहे. मी तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवू शकत नाही. ही आघाडी भाजपचे आव्हान पेलेल यावर माझा विश्वास नाही. विरोधी आघाड्यांना भाजप विरोधात यश मिळणे कठीण आहे.

Back to top button