१ कोटींचं बक्षीस असणारा माओवादी नेता हरिभूषणचा हृदविकाराने मृत्यू | पुढारी

१ कोटींचं बक्षीस असणारा माओवादी नेता हरिभूषणचा हृदविकाराने मृत्यू

गडचिरोली, पुढारी ऑनलाईन : जहाल माओवादी नेता हरिभूषण याचा गडचिरोलीच्या माओवादी प्रभागात मृत्यू झाला आहे. हरिभूषण याच्यावर तब्बल १ कोटींचं बक्षीस होतं. हरिभूषण याला कोरोनाची लागण झाली होती. 

हरिभूषण हा ४ राज्यांमध्ये असणाऱ्या असणाऱ्या माओवादी प्रभागामध्ये सक्रीय होता. तो माओवादींचा म्होरक्या असल्याने त्याच्या दंडकारण्यात १ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सुकामा जिल्ह्यातील जंगलात हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

हरिभूषण याच्या मृत्यूपूर्वी मागील २७ मेपासून ४ जहार माओवाद्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हरिभूषण हिंसक घटनांमध्ये अग्रेसर होता. तसेच त्याने पोलिस दलावरदेखील अनेक हल्ले केलेले होते. 

हरिभूषण याच्या मृत्यूवर दंडकारण्यातल्या यंत्रणा आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचेदेखील लक्ष होते. हरिभूषण काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील भागातील माओवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. हरिभूषण हा मागील २५ वर्षांपासून सक्रीय होता. 

गडचिरोलीमध्ये कोरोनाने सर्व प्रभावित झाले, तसेच माओवाद्यांनादेखील कोरोनाने घेरलेले आहेत. दंडकारण्य भागात कोरोनाने आणि विषबाधा झाल्याने १० माओवादी मृत्यू झालेले आहेत. मागील ४० वर्षांपासून दंडकारण्यात माओवाद्यांनी हिंसक कारवाया केलेल्या आहेत. 

माओवाद्यांना नेहमी पोलिस दर आणि सुरक्षा दलाकडून भीती असते. मात्र, यंदा कोरोनाने त्यांना गाठलेलं आहे. दंडकारण्यात बस्तर, तेलंगणा, ओरोसा, आंध्रप्रदेश आणि गडचिरोलीचा भाग येतो. घनदाट अरण्यात वावरत असणाऱ्या माओवाद्यांना कोरोनाने गाठले आणि त्यातून त्यांचा मृत्यू झालेला आहे. १० माओवादी मृत्यू झाल्याची माहिती बिजानुरच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. 

Back to top button