'पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला काँग्रेस जबाबदार'

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलं आहे. आज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर प्रतिक्रिया दिली. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला काँग्रेस जबाबदार असल्याच धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
वाचा : हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट, २ ठार
काँग्रेसने २०१४ पूर्वीच तेल बॉन्ड घेऊन आपल्यावर लाखो-कोटी रुपयांची थकबाकी ठेवली. या थकबाकीचे मूळ आणि व्याजाची रक्कम आताच्या सरकारला चुकवावी लागत आहे. इंधनाच्या किंमती वाढण्यामागे हेदेखील एक प्रमुख कारण आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटल आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींत वाढ झाली आहे. देशाची गरज भागवण्यासाठी ८० टक्के तेल बाहेरून मागवावे लागत आहे, असेही धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
वाचा : मुंबईकरांना दिलासा! अखेर मालमत्ता करवाढीला स्थगिती
वाचा : #WTC21 : कमबॅक सुरु; भारताला दुसऱ्या डावात १०० धावांची आघाडी