SBI कडून हेल्थकेअरसाठी कर्ज योजनेची घोषणा | पुढारी

SBI कडून हेल्थकेअरसाठी कर्ज योजनेची घोषणा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : SBI कडून हेल्थकेअर विभागासाठी बिझनेस लोनची मोठी घोषणा केली आहे. SBI गुरूवारी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संबंधित क्षेत्राशी निगडीत विभागांना किरकोळ अटी घालत ही योजना लागू करणार आहे. रुग्णालये, नर्सिंग होम, डायग्नोस्टिक सेंटर यासह अन्य आरोग्याशी संबंधित विभागांना १०० कोटींपर्यंत मदत केली जाणार आहे. कोरोना काळात देशात आरोग्य व्यवस्थेला चालना मिळण्यासाठी SBI ने ही योजना लागू केली आहे.

अधिक वाचा : आम्हाला सोबत घेतल्यास मतविभाजनाचा भाजपला फायदा : रामदास आठवले

रूग्णालये, नर्सिंग होम, डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅब, आरोग्य क्षेत्रातील उत्पादक, पुरवठा करणारे, आयात करणारे, लॉजिस्टिक कंपन्या इत्यादींना १०० कोटीपर्यंतची कर्जे (भौगोलिक परिस्थितीनुसार) दिली जाणार आहेत. हे कर्ज १० वर्षात परत करण्याची मुभा आहे. ही कर्ज योजना क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर माइक्रो एंड स्मॉल एंटरप्राइजेज (CGTMSE) या अंतर्गत देण्यात येणार आहे.

SBI चे चेअरमन दिनेश खारा म्हणाले की, आमच्या आरोग्यदायी योजनांनी कोरोना महामारी काळात अभूतपुर्व मदत केली आहे. रुग्णालयांचे कोरोना काळातील योगदान लक्षात घेता या योजनेचा रुग्णालयांना उभारी मिळण्यासाठी मोठे योगदान मिळणार आहे. 

अधिक वाचा : कोल्हापूर जिल्ह्याची सुटका नाहीच; निर्बंध कायम

देशातील आरोग्य व्यवस्था अजून मजबून होण्यासाठी या योजनेचा चांगला फायदा होणार आहे. रुग्णालयांना कर्जाचा पुरवठा झाल्यावर रुग्णालयांत आधुनिक यंत्र सामुग्री मिळण्यासाठी चालणा मिळणार आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी SBI काम करत आहे. 

अधिक वाचा : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांसाठी मदत उपायांची घोषणा करताना म्हटले होते की बँकांना ५० कोटींची रोखड उपलब्ध करुन दिली जाईल. जेणेकरून कोरोना काळात उद्योगांना मोठी चालना मिळेल. लस उत्पादक, लसींच्या आयात निर्यात करणाऱ्या तसेच वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्या रुग्णालयांना नवीन कर्जे देता येतील.

Back to top button