पेट्रोल-डिझेलमुळे खिसा रिकामा! दरात पुन्हा वाढ | पुढारी

पेट्रोल-डिझेलमुळे खिसा रिकामा! दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल व डिझेल दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलने प्रतिलिटर 104 रुपयांचा तर दिल्लीत 98 रुपयांचा स्तर ओलांडला आहे. 

वाचा : आजपासून नवे निर्बंध; हे असेल सुरू

जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाच्या दरात मोठी तेजी आली आहे. तीन वर्षात पहिल्यांदाच ब्रेंट क्रूडचे प्रतिबॅरलचे दर 76 डॉलर्सवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोल 98.11 रुपयांवर गेले आहे तर मुंबईत हेच दर 104.22 रुपयांवर गेले आहे. वरील दोन्ही शहरात डिझेलचे प्रतिलीटरचे दर क्रमशः 88.65 आणि 96.16 रुपयांवर गेले आहेत. 

वाचा : अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक

अन्य महानगरांचा विचार केला तर कोलकाता येथे पेट्रोल 97.99 रुपयांवर आणि डिझेल 91.49 रुपयांवर गेले आहे. चेन्नई येथे हेच दर क्रमशः 99.18 आणि 93.22 रुपयांवर गेले आहेत. भोपाळमध्ये पेट्रोल 106.35 रुपयांवर आणि डिझेल 97.37 रुपयांवर गेले असून रांचीमध्ये इंधन दराने क्रमशः 93.82 आणि 93.57 रुपयांची पातळी गाठली आहे. बंगळूरमध्ये हेच दर 101.39 आणि 93.98 रुपयांवर गेले आहेत. पाटणामध्ये पेट्रोल 100.13 रुपयांचा तर डिझेलने 94 रुपयांचा स्तर गाठला आहे.

वाचा : मुंबई, पुणे महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र?

Back to top button