मौलवीच्या गुप्तांगावर पत्नीचा चाकूने वार! | पुढारी

मौलवीच्या गुप्तांगावर पत्नीचा चाकूने वार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आधीच्या दोन पत्नी असतानाही तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मौलवीच्या गुप्तांगावर पत्नीने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ७७ वर्षीय मौलवीचा मृत्यू झाला आहे. 

वाचा : मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राने अधिवेशन बोलवावे : हसन मुश्रीफ

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शिकारपूर येथे ही घटना घडली आहे. मौलवीची दोन लग्ने झाली असून तो ७७ वर्षांचा होता. तरीही त्याने तिसऱ्या लग्नाचा घाट घातला होता. त्यातून घरात वाद झाला. वादातून पहिल्या दोनपैकी एका पत्नीने मौलवीवर चाकू हल्ला केला. तिने त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर भौरकला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा घडली आहे. 

वाचा : आम्हीही गप्प बसणार नाही, बघून घेऊ; शिवसेनेचा भाजपला इशारा 

आरोपी महिलेने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने मौलवीवर अत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्यांना याबद्दल संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. भौकराला पोलिस स्टेशनमधून दिलेल्या माहितीनुसार ‘संबधित मौलवीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोक त्याचा दफनविधी करण्याचा प्रयत्न करत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यावेळी त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी आणि गुप्तांगावरदेखील गंभीर जखमा झाल्याचे समोर आले. हा व्यक्ती भौरा खुर्द गावातील मशिदीत मौलवी होता. मौलवी वकील अहमदने यापूर्वीच दोन लग्नं केली होती. त्याला ५ मुली असून त्यातील चौघींचे लग्न झाले आहे.

मौलवीनेही दुसरे लग्न केल्यानंतर ती सहा महिन्यांतच सोडून गेली. त्यानंतर मौलवीने तिसऱे लग्न करणार असल्याची माहिती हाजराला दिली. त्यावर हाजराने आपल्या अविवाहित मुलीचे आधी लग्न कर असे सांगितले. यावरुन बुधवारी दोघांमध्ये वाद झाला. त्या रात्री मौलवी झोपेत असताना हाजराने स्वयंपाकघरातील चाकूने गुप्तांगावर हल्ला केला. 

वाचा : अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक

Back to top button