मुस्लिम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याकडून वृद्धाची हत्या | पुढारी

मुस्लिम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याकडून वृद्धाची हत्या

रतलाम ; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील सर्वात वयोवृद्ध सरपंच पिस्ताबाई चत्तर (वय 86) यांचा मोठा मुलगा भंवरलाल (65) यांची एका भाजपने नेत्याने हत्या केली आहे. भाजप नेता दिनेश कुशवाह यांनी मुसलमान असल्याच्या संशयाने भंवरलाल यांना माराहण केली. पिस्ताबाई यांचे संपूर्ण कुटुंब 16 मे रोजी चितौडगडला गेले होते. त्या दिवसांपासून भंवरलाल बेपत्ता होते. शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह मिळाला.

दरम्यान, दिनेश कुशवाह यांनी भंवरलाल यांच्याकडे आधारकार्ड मागितले. भंवरलाल हे मनोरुग्ण असून त्यांच्या तोडून चुकून आपले नाव मोहम्मद असल्याचे बाहेर पडले. त्यानंतर दिनेश यांनी भंवरलाल यांना माराहण करण्यास सुरुवात केली. यामध्ये भंवरलाल यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दिनेश कुशवाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या माराहणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भाजप नेत्याकडून बेदम मारहाण

भाजप नेते दिनेश कुशवाहा यांनी वृद्धाला मारहाण केली आहे. व्हिडिओत ते भंवरलालकडे आधारकार्ड दाखवण्याची मागणी करत त्यांना मारहाण करताना दिसून येत आहे. दिनेशने नाव व पत्ता विचारला तर मानसिकदृष्ट्या कमकूवत भंवरलाल यांच्या तोंडातून मोहम्मद निघाले. हे ऐकून दिनेश त्यांच्यावर तुटून पडला. त्याने आधार कार्डाची मागणी करत भंवरलाल यांना लाथाबुक्क्या मारल्या. पोलिसांनी दिनेश कुशवाहा यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. दिनेश भाजप युवा मोर्चा व नगर विभागातील पदाधिकारी आहेत. त्यांची पत्नी मनासा नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 3 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

मारहाणीचा व्हिडिओ आरोपीनेच केला व्हायरल

मारहाणीचा व्हिडिओ आरोपी दिनेशने स्वतःच व्हायरल केला. तेथून तो भंवरलाल यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारावर भाजप नगरसेविकेचा पतीचा शोध सुरू करुन एफआयआर नोंदवला. सध्या तो फरार आहे. प्रारंभी मनासा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास चालढकल केली. पण, जैन समाज व कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपी दिनेश कुशवाहावर भादंवि कलम 302 व 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button